डर्बी : इंग्लंडमधील डर्बीशर परगण्याचे ठाणे. लोकसंख्या २,१९,३४८ (१९७१). डरवेंट नदीकाठचे हे शहर चिनी मातीच्या भांड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. मोटारी, मोटारीची व विमानाची एंजिने, विणलेले कपडे, साबण, रंग, चामडी, विद्युत् उपकरणे, रेशमी व सुती धागा, कापड व कपडे हे उद्योगही आहेत. हे मोठे रेल्वे केंद्र आहे. हेन्री कॅव्हेंडिश, हर्बर्ट स्पेन्सर, जोसेफ राइट यांचे जन्मस्थळ व जॉर्ज एलियटचे निवासस्थान, सेंट पीटर्स चर्च, चौसष्ट मी. उंचीच्या मनोऱ्याचे ऑल सेंट्रल चर्च संग्रहालय, कलावीथी, नगरभवन, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, गुरांचा बाजार ही येथील वैशिष्ट्ये आहेत.

यार्दी, ह. व्यं.