टीमिश्वारा : पश्चिम रूमानियातील व्यापारी, औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र लोकसंख्या २,०४,६८७ (१९७३). हे बूकारेस्टच्या वायव्येस ४०० किमी. असून यावर रोमन, तार्तर, हंगेरी, तुर्की, ऑस्ट्रिया, सर्बिया यांच्या सत्ता येऊन गेल्या असून लोकांत मग्यार व जर्मनही आहेत. येथे शेतीअवजारे, प्लॅस्टिक, कापड, विद्युत्‌सामग्री, यंत्रे, रेल्वेमाल, रसायने, मद्ये, पादत्राणे इत्यादींचे उत्पादन होते. येथे विद्यापीठ, विविध शिक्षणसंस्था, कलाभिवृद्धी संस्था, ऐतिहासिक वास्तू इ. असून गावातून गेलेल्या बेगा कालव्याच्या तीरांवरील उद्यानांमुळे ते आकर्षक झाले आहे.

लिमये, दि. ह.