टॉमसनाइट : झिओलाइट गटातील खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, क्वचित आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. स्तंभाकार व अरीय पुंजक्यांच्या, संहत व संधितांच्या रूपात आढळते.⇨पाटन (010) चांगले. भंजन खडबडीत ते अर्धशंखाभ [⟶खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ५–५·५. वि. गु. २·३. चमक काचेसारखी ते काहीशी मोत्यासारखी. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग पांढरा, तांबूस, हिरवट, उदी. कस रंगहीन. तापमानात योग्य तऱ्हेने बदल झाल्यास त्याच्या स्फटिकावर विद्युत् भार निर्माण होतात म्हणजे ते उत्तापविद्युतीय गुणधर्माचे असते.

रा. सं. (Ca,Na)6Al8(Al,Si)2Si10O40·12H2O).

हेबेसाल्ट खडकातील पोकळ्यांत व भेगांमध्ये इतर झिओलाइटांबरोबर परंतु विरळाच आढळते. टॉमस टॉमसन या स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञांच्या नावावरून टॉमसनाइट हे नाव पडले.

पहा :झिओलाइट गट.

ठाकूर, अ. ना.