टाकोराडी : सेकंडी-टाकराडी. घानाच्या वेस्टर्न विभागाची राजधानी व सागरी बंदर. लोकसंख्या ८९,६८६ (१९७०). सोनेखाण क्षेत्राकडील लोहमार्गामुळे कोंदी (सेकंडी) व आधुनिक कृत्रिम बंदरामुळे टाकोराडी भरभराटले. १९४६ मध्ये दोन्ही एक झाली. बॉक्साइटची निर्यात व तेलाची आयात यांशिवाय लाकूड कापणे व जहाजबांधणी , रेल्वेदुरुस्ती, मासेमारी, सिगारेटी इ. लहानमोठे उद्योग येथे आहेत.

लिमये, दि. ह.