कॅन : फ्रान्सच्या आग्‍नेय भागातील बंदर.लोकसंख्या ६७,१५२ (१९६८). आल्प्स मॅरिटाइम  प्रांतातील हे बंदर नीसच्या नैर्ऋत्येस२ ९किमी.असून फ्रेंच रिव्हिएरा मधील हवा खाण्याचे प्रसिद्ध  ठिकाण आहे.येथील साबण व सुवासिक पदार्थ प्रसिद्ध असून येथून फुले, फळे, तेले आणि अँचोव्ही मासे निर्यात करतात.मध्ययुगात मूरांच्या हल्ल्यात हे दोनदा उद्ध्वस्त झाले.१८१५ मध्ये नेपोलियन  बोनापार्ट एल्बाहून निसटला, तो कॅनजवळ फ्रेंच किनाऱ्यावर उतरला.दर वसंत ऋतूत येथे  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होतो.येथील नेत्रदीपक वसंतोत्सव व पारंपारिक फुलांची  लढाई प्रसिद्ध आहे.  

ओक, द. ह.