टाकोमा : अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्याच्या पीअर्स परगण्याचे ठाणे. महानगरीय लोकसंख्या ३,३२,५२१ (१९७०). हे प्यूजित साऊंडच्या कमेंन्समेंट आखातावरील बंदर. सिॲटलच्या दक्षिणेस ४० किमी. असून लाकूड कापणे, लाकडाच्या वस्तू, विद्युत् रासायनिक संयंत्र, जहाज कारखाना, धातुशुद्धी, ओतशाळा, अन्नपदार्थप्रक्रिया, तांबे, फॉस्फेट यांवरील प्रक्रिया इ. व्यवसाय येथे चालतात. प्यूजित साऊंड व ल्यूथरन विद्यापीठ, फोर्ट लूइस, मॅक्‌कॉर्ड हवाईदल तळ, पॉइंट डिफायन्स पार्क, संग्रहालये ही येथील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

लिमये, दि. ह.