टॅलाहॅसी : अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्याची राजधानी. महानगरीची लोकसंख्या ७७,८५१ (१९७०). हे मेक्सिकोच्या आखाताच्या ॲपलॅची उपसागराच्या उत्तरेस ४० किमी. आहे. टॅलाहॅसी हे घाऊक वितरणाचे व लाकूड, त्याच्या वस्तू, टर्पेंटाइन, पीकान यांचे केंद्र आहे. फ्लॉरिडा राज्य विद्यापीठ, निग्रोंसाठी फ्लॉरिडा कृषी व यांत्रिक विद्यापीठ, ज्यूनियर कॉलेज इ. शिक्षणसंस्था व राज्य ग्रंथालय, डेव्हिड वॉकर सार्वजनिक ग्रंथालय, राज्य भूविज्ञान सर्वेक्षण संग्रहालय येथे आहेत. लोहमार्गाच्या वाढीबरोबर याचे व्यापारी महत्त्व कमी झाले, तरी शैक्षणिक व राजकीय महत्त्व वाढले आहे.

लिमये, दि. ह.