झांझिबार शहर : टांझानियाच्या झांझिबार बेटाचे कारभाराचे ठाणे व व्यापारी बंदर. लोकसंख्या ६८,४९०
(१९६७ अंदाज). बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे नैसर्गिक, सुरक्षित व खोल बंदर असून येथून मुख्यतः लवंगा, खोबरे, खोबरेल तेल व कच्छ वनस्पतीची साल निर्यात होते. जगाला लवंगांचा पुरवठा येथूनच होतो. एकोणिसाव्या शतकात हे गुलामांच्या व्यापारासाठी कुप्रसिद्ध होते. हस्तिदंताचाही व्यापार चाले.
झांझिबार हे प्रमुख्याने मुस्लिम शहर आहे. शिया व सुन्नी या दोन्ही पंथांप्रमाणे अल्प प्रमाणात इस्माइली, खोजा, बोहरी, हिंदू, जैन, बौद्ध, शिख, ख्रिस्ती लोकही आहेत.
झांझिबारच्या अरबी लाकडी पेट्या आणि कोरीवकामाचे विशिष्ट दरवाजे प्रसिद्ध आहेत.
लिमये, दि. ह. कुमठेकर, ज. ब.
“