झॅग-आ-झिग : ईजिप्तच्या शार्कीया अधिशासकीय प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,७३,००० (१९७० अंदाज). हे नाईलच्या त्रिभुज प्रदेशात दोन कालव्यांच्या संगमावर कैरोच्या उत्तर–ईशान्येस असून उत्तम कापसाच्या आणि धान्याच्या व्यापाराचे केंद्र आहे. येथे तेलघाण्या व साबणाचे कारखाने आहेत. लोहमार्ग व सडका यांचे हे महत्त्वाचे प्रस्थानक आहे.

लिमये, दि. ह.