किरात – १ : (ओले किरायत हि. किर्यात, महातीत गु. किरीयाता क. नेळबेवू-गिड सं. भूनिंब, किरात इं. क्रिट लॅ. अँड्रोग्रॅफिस पॅनिक्युलेटा कुल-अकॅँथेसी). महाराष्ट्रातील रुक्ष जंगलात मोठ्या झाडाच्या सावलीत वाढणारी ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ð ओषधी ०⋅३-०⋅९ मी. उंच असून ती श्रीलंकेत व भारतात इतरत्र (कारवार) सामान्यपणे आढळते. शारीरिक लक्षणे सामान्यतः ð ॲकॅंथेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.  फांद्या चौकोनी पण शेंड्याकडे सपक्ष पाने लहान, भाल्यासारखी, खालची बाजू फिकट, कडा तरंगित, फुलोरा कक्षास्थ (बगलेतील) किंवा अग्रस्थ (शेंड्यावरील), मंजरी किंवा परिमंजरी [→ पष्पबंध, ] फुले लहान, सच्छद, गुलाबी असून ती डिसेंबरात येतात.  बोंड लांबट व दोन्हीकडे टोकदार बिया अनेक, पिंगट व त्यांवर खातांकित (स्थानिक स्वरूपाचे पातळ) ठिपके असतात. ही ओषधी कडू, पौष्टिक व बंगालमध्ये ‘कालमेघ’ म्हणून प्रसिद्ध असून हिच्यापासून ‘अलुई’ नावाचे घरगुती औषध बनवितात.  मुळे व पाने शक्तिवर्धक, कृमिनाशक, ज्वरनाशक व पोटदुखीवर उपयुक्त रस तापावर (इन्ल्यूएंझावर) गुणकारी. हिंग, डिकेमाली, वेखंड इ. द्रव्यांबरोबर किरात पोटदुखी, अजीर्णामुळे होणारे जुलाब व साधारण ताप यांवर देतात. अँड्रोग्राफोलीन कालमेघीन ही दोन कटुद्रव्ये किरातामध्ये असतात.

पाटील, शा. दा.