बेलवलकर,श्रीपाद  कृष्ण : (१० डिसेंबर १८८० – ८ जानेवारी १९६७). थोर प्राच्यविद्यापंडित. जन्म नरसोबाची वाडी ह्या प्रसिद्ध क्षेत्री. प्राथमिक शिक्षण कोल्हापूरजवळील हेर्ले ह्या गावी माध्यमिक शिक्षण कोल्हापुरच्या राजाराम हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरच्या राजाराम महाविद्यालयात व  पुण्याच्या  

श्रीपाद कृष्ण बेलवलकर

डेक्कन कॉलेजात १९०२ मध्ये इंग्रजी व संस्कृत हे विषय घेऊन बी. ए. झाले. त्यानंतर डेक्कन कॉलेजात फेलो (१९०२-०४). त्याच काळात शेली व वर्ड्‌स्वर्थ ह्यांच्या काव्यावर लिहीलेल्या निबेधाला मुंबई विद्यापीठाचे `होमजी करसेटची दादी पारितोषिक’ मिळाले. (१९०३). नंतर `इंग्रजी-संस्कृत’ `इतिहास-राज्यशास्त्र’`ग्रीक आणि युरोपीय तत्वज्ञान’ असे विषय घेऊन त्यांनी एम्‌. ए. ची पदवी तीनवेळा मिभ्वीली. `झाला वेदान्त पारितोषिक’ आणि तत्वज्ञानाचे `तेलंग सुवर्णपदक’ ही त्यांनी मिळवीले. काही काळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर डंक्कन कॅलेजात क्यूरेटर ह्या पदावर त्यांची नेमणूक झाली. तेथे असतांना त्या कॉलेजच्या संग्रहातील व्याकरणविषयक हस्तलिखितांची पहिली वर्णनात्मक सुची त्यांनी तयार केली त्यातूनच त्यांचा `सिस्टिम्स ऑफ संस्कृत ग्रामर’ हा शोध निबंध सिद्ध झाला व तो मुंबई विद्यापीठाच्या `मुडलिक सुवर्णपदका’ स पात्र ठरला. (१९१०, ग्रंथरूपाने प्रकाशित १९१५, दु. आवृ. १९७६). पुढे ते अमेरिकेस गेले आणि तेथील हार्व्हर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर  प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवीली (१९१४). ह्या नाटकाचे इंग्रजी आणि मार्मिक टिपासह मराठी भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले (इंग्रजी १९१५ मराठी १९१५). अमेरिकेहून परतल्शवर (१९१५) एकुण १८ वर्ष ते डेक्कन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. प्रध्यापक म्हणून त्यांनी अत्यंत तळमहीने आपल्या व्यसंगाचा लाभ विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या विद्यार्थ्याम डॉ. रा. ना. दांडेकर ह्याच्यासारख्या प्राच्यविद्यापंडितांचा समावेश होतो. ह्या कालखंडात ते दोन वेळा (१९१७-१८१९२७-३३) भांडारकर प्राच्यविद्यासंशेधनमंदिराचे मानद सचिव झाले. महाभारताची  चिकीत्सक आवृत्ते तयार करण्याच्या ह्या संस्थेच्या प्रकल्पात त्यांचा प्रथम पासूनच सहभाग होता. १९४३ ते १९६१ ह्या कालखंडात ते ह्या प्रकल्पाचे प्रमुख संपादक होते व त्यांच्याच हातून हाप्रकल्प पुर्ण झाला. भांडारकर प्राच्यविद्यासंशेधनमंदिराची स्थापना, उभारणी व संस्थेला मिळालेले अखिल भारतीय व आंतरराष्ट्रिय कीर्तिचे स्थान ह्यांत बेलवलकरांचा कतृत्वाचा वाटा मोठा आहे.

संशोधनाच्या व लेखनाच्या क्षेत्रात बेलवलकरांनी बजावलेली कामगिरी मोठी आहे. गीता  अभिज्ञानशाकुंतल  ह्या ग्रंथाची प्रमाणित आवृत्ती त्यांनी काढली (अनुक्रमे १९४१ १९६५) महाभारतातील  भीष्मपर्व व शांतीपर्व ह्यांचे संपादन केले (भीष्मपर्व, १९५७ शांतिपर्व, १९५० ते ५३) दांडीच्या काव्यादर्शाची आवृत्ती काढून (१९२०) त्याचे इंग्रजी भाषांतरही प्रसिद्ध केले (१९२४). भारतीय तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक इतिहासाची गुरुदेव डॉ.रा. द. रानडे ह्यांच्या सहकार्याने त्यांनी एक योजना आखली व तिच्यातील क्रिएटिव्ह पिरिअड हा वेद, ब्राह्मणे, उपनिषदे ह्यांच्याशी संबंधित असलेला दुसरा खंड लिहिला, संपादिला (१९२७).

त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आणि संशोधनलेखांत माठरवृत्ति (१९२४), कॅनन्स ऑफ टेक्स्च्यूअल अँड हायर क्रिटिसिझम अप्लाइड  टू शाकुंतल (१९२५), वेदान्त फिलॉसफी (१९२९), बसु मलिक लेक्चर्स ऑन वेदान्त  (१९२९) हे ग्रंथ व ‘डेट ऑफ ईश्वरकृष्ण’, ‘लिटररी स्ट्राटा इन ऋग्वेद’, ‘भास अँड शूद्रक’, ‘अंडर-करंट्‌स ऑफ जैनिझम’, ‘पर्यंकविद्याइन कौशितकी उपनिषद’ ह्यांसारखे लेख ह्यांचा समावेश होतो. त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि सखोल व्यासंगाचा प्रत्यय त्यांतून येतो.

अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या विविध वर्षी भरलेल्या अधिवेशनात ‘वैदिक’ विभागाचे (१९२२), ‘वेद आणि अवेस्ता’ विभागाचे (१९२६) आणि ‘तत्त्वज्ञान’ विभागाचे (१९३०) ते अध्यक्ष होते. १९४३ मध्ये ह्या परिषदेचे ते प्रमुख अध्यक्ष झाले. रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना लंडन आणि मुंबर्स शाखांचे सन्मान्य सदस्यत्व दिले होते (१९४३). भारताच्या राष्ट्रपतींकडून, १९६० मध्ये त्यांना ‘संस्कृत पंडित’ म्हणून मानपत्र व आजीव मानधन प्राप्त झाले. पुणे येथे ते निधन पावले.              

भट, गो.के.