किरमिरा : (हिं. वन-निंबू क. गुरुवेदे, मनिक्यान सं. वननिंबुका, अश्वशकोत इं. टूथब्रश प्लॅंट, लॅ. ग्लॉयकॉस्मिस पेंटाफिला कुल-रूटेसी). हे एक सरळ वाढणारे क्षुप (झुडूप) असून त्याचा प्रसार भारतात सर्वत्र आहे शिवाय श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, चीन, मलाया, बोर्निओ इ. प्रदेशांतही आहे. पाने संयुक्त, पिसासारखी तीन ते पाच दलांची क्वचित एकदली फुले लहान, पांढरी व पानांच्या बगलेत लांब परिमंजऱ्यांवर येतात.  मृदुफळ गोलसर, गुलाबी किंवा फिकट पिवळसर व फार लहान, एक सेंमी. व्यासाचे बिया एक ते तीन फळे खाद्य. इतर लक्षणे ð रूटेसी कुलवर्णनाप्रमाणे असतात. 

मुळे कुटून सारखरेबरोबर बारीक तापात देतात मुळे व साल कफ, ज्वर, संधिवात, रक्तक्षय, कावीळ यांवर उपयुक्त पानांचा रस नायटे व इतर चर्मरोगांवर लावतात. ग्लॉयकॉस्मीन हे ग्लायकोसाइड पानांत असते.

ठोंबरे, म. वा.