किंग, अर्नेस्ट जोसेफ :(२३ नोव्हेंबर १८७८ — २५ जून १९५६). दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचा नौदलप्रमुख. १९०१ मध्ये नाविक अकादमीतून उत्तीर्ण झाल्यावर विविध ठिकाणी कामगिरी. पहिल्या महायुद्धात हा दुय्यम नौदल प्रमुख होता. जपान्यांचा पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर याच्याकडे अमेरिकन नौदल प्रमुखत्व आले. दुसऱ्या महायुद्धातील कामगिरीबद्दल याला सर्वोच्च पदक मिळाले.

चाफेकर, शं. गं.