कॉर्न बेल्ट: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ओहायओ, इंडियाना, इलिनॉय, आयोवा, माँटॅना, कॅनझस, नेब्रॅस्का, साउथ डकोटा, मिनेसोटा ह्या राज्यांतील मका पिकविणाऱ्या प्रदेशात रूढ झालेली संज्ञा. मक्याच्या लागवडीला अत्यंत पोषक असे हवामान व मृदा या पट्ट्यात आढळते. ह्या मक्यावर डुकरे व गुरे यांचे पोषण केले जाते. म्हणून हा प्रदेश समृद्ध झाला आहे. आता या पट्‌टयात सोयाबीन व काही इतर शेतीउत्पन्नेही काढतात.

लिमये, दि.ह.