कालीनिन : रशियातील व्होल्गा नदीवरील शहर. लोकसंख्या ३,६७,००० (१९७२). मॉस्कोच्या वायव्येस १६० किमी. अंतरावरील हे शहर मॉस्को –लेनिनग्राड लोहमार्गावरील तसेच अनेक महामार्गांवरील महत्त्वाचे केंद्र आहे. रेल्वेच्या वाघिणी व उतारूंचे डबे, विविध यंत्रसामग्री, कापड, जहाजे, प्लॅस्टिक व रेयॉनच्या वस्तू, रबराच्या व कातड्याच्या वस्तू वगैरेंचे कारखाने येथे आहेत. ट्‌वेर्त्सा व व्होल्गा यांच्या संगमावरील ह्या शहराला पूर्वी ‘ट्‌वेर’ म्हणत असत. दुसऱ्या महायुद्धात ह्या शहराचा ताबा काही दिवस जर्मनांनी घेतला होता.

लिमये, दि. ह.