कँताता : मूलत: कँताता म्हणजे ‘गाइलेले’. ‘वाजविलेले’ या अर्थाच्या ‘सोनाटा’ या संज्ञेच्या विरुद्ध अशी संज्ञा म्हणजे कँताता. आज मात्र स्वतंत्रपणे एका आवाजाने वा सांघिक रीत्या वा वाद्यवृंदासह गाइल्या जाणाऱ्या कोणत्याही धार्मिक वा लौकिक रचनेस अनुलक्षून ही संज्ञा वापरली जाते. ‘कँताता द कॅमेरा’ हे या संगीत प्रकाराचे सर्वांत जुने लौकिक स्वरूप होय. धार्मिक स्वरूपाच्या कृतीस ‘कँताता द किएसा’ (चर्च कँताता) म्हणत. बाक ह्या विख्यात जर्मन संगीतकाराने अनेक कँताता लिहिले  आहेत.

मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)