कळसूबाई : सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर. उंची समुद्रसपाटीपासून १,६४६ मी. हे नासिक जिल्हा  आणि अहमदनगर जिल्हा यांच्या सरहद्दीवर, इगतपुरीच्या आग्‍नेयीस आहे. कोळी मुलीच्या नावावरून  शिखराला हे नाव पडले अशी आख्यायिका असून शिखरावर तिचे देऊळ आहे. कोळी व आदिवासीलोक तिला कुलस्वामिनी मानतात.

शाह, र. रू.