कारा समुद्र : रशियाच्या उत्तरेकडील नॉव्हाया झीमल्या व सेव्हर्नाया झीमल्या या बेटांमधील समुद्र. आर्क्टिक महारागराचा हा फाटा उथळ, सरासरी २०७ मी. खोल असून वर्षातील नऊ महिने गोठलेला असतो. ओब, येनिसे, प्यासिना व तैमिरा या महत्त्वाच्या नद्या या समुद्रास मिळतात. येनिसे मुखावरील डिक्सन, ओबवरील नोव्ही पोर्ट ही या समुद्रावरील महत्त्वाची बंदरे आहेत.

शाह, र.रु.