कामेट : हिमालयातील एक शिखर. उंची ७,७५६ मी. हिमाचल प्रदेशाच्या लाहूल व स्पिटी जिल्ह्यांतील झास्कर पर्वतश्रेणीमध्ये हे मुख्य पर्वतश्रेणीच्या थोडे उत्तरेला आहहे. मान्सूनचा स्पर्श त्यास होत नसल्याने सभोवतालचा प्रदेश ओसाड आहे. ब्रिटिश काळापासाून याच शिखराकडे गिर्यारोहकांचे लक्ष प्रामुख्याने वेधले गेले. या शिखराच्या आसपासच्या भागांतून हिमनद्यांचे उगम झालेले आहेत. सी.एफ्‌. मीड यांनी १९१० साली बरेच प्रयत्न करुन शिखरावर जाण्याचा योग्य मार्ग आखला. त्याचेच नाव या प्रदेशातील एका शिखराला दिले गेले. अबि-गामीन शिखर ७,००८ मी., मीड्‌सकॉल ५,१६० मी. अशी दोन महत्त्वाची शिखरे याच भागात आहेत. तसेच खैराम हिमनदी ,पूर्व कामेट हिमनदी याही या प्रदेशात मोडतात.

खातु, कृ.का.