कटायव्ह , व्हल्यिंट्यीन प्यिट्रॉव्ह्यिच  : (२८ जानेवारी १८९७ — ). रशियन कादंबरीकार आणि नाटककार. जन्म रशियातील ओडेसा येथे. Rastratchiki (१९२६, इं. भा. द इंबेझ्‌लर्स, १९२९) ही त्याची विशेष यशस्वी ठरलेली पहिली कादंबरी. Vremya vpered (१९३२, इं. भा. टाइम, फॉर्‌वर्ड!, १९३३) ही त्याची आणखी एक उल्लेखनीय कादंबरी. मॅग्‍निटोगॉरर्स्क येथील रासायनिक कारखान्यातील कामगार आणि तंत्रज्ञ ह्यांच्या कामगिरीचे चित्रण तीत केले आहे. त्याने लिहिलेल्या अनेक सुखात्मिकांपैकी Kvadratura kruga (१९२८, इं. भा. स्क्वेअरिंग द सर्कल, १९४३) ह्या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली आहे. १९२०च्या सुमारास सोव्हिएट रशियाने घटस्फोटाचे कायदे शिथिल केले. त्यातून उद्भवलेल्या प्रसंगांवर ह्या नाटकाची प्रहसनात्मक मांडणी करण्यात आली आहे.

मेहता, कुमुद