कॅसलरॉक : कर्नाटक राज्यातील एक स्थळ. हे दक्षिण रेल्वेच्या लोंढा-मार्मागोवा मार्गावर लोंढा प्रस्थानकापासून सु. २६ किमी. आहे. गोवा प्रदेशाची सीमा येथून पाच किमी. वर असल्याने गोव्यावर पोर्तुगीज अंमल असताना येथे जकात ठाणे होते. गोवा हद्दीतील रम्य पर्वतवनश्री व दूधसागर हा प्रेक्षणीय धबधबा येथून मार्मागोव्याकडे जाताना आगगाडीतून दिसतो.

ओक, शा. नि.