समीरपन्नग : (आयुर्वेद). पारा, गंधक, सोमल व हरताळ यांचा हा कल्प आहे. ही द्रव्ये तुळशीच्या रसात खलून केलेला गोळा अभकाने वेष्टून दोन परळांच्या संपुटात ठेवून, ते संपुट वालुका यंत्रात ठेवून मंदअग्नीवर चार प्रहर तो गोळा पक्व करावा. पुष्कळसे वैदय हा कुपीत पक्व करतात. आपोआप थंड झाल्यावर तो उपयोगात आणावा. सन्निपात ज्वर, त्यात बडबड सुरू झाली असता, सांधे जखडले तर किंवा कफ विकारात विडयाच्या पानाच्या रसात हा कल्प दयावा. खोकल्यात कफ सुटण्याकरिता तूप-सैंधव किंवा तूप-पिंपळीबरोबर हा दयावा.
जोशी, वेणीमाधवशास्त्री