वानर : (हनुमान माकड). वानराचे शास्त्रीय नाव सेम्नोपिथेकस एन्टेलस आहे. पश्चिम हिमालयातील वानर जास्त वजनदार म्हणजे १५ ते २५ किग्रॅ. वजनाचे असतात. उंची ३० – ४५ सेंमी. असते. शेपूट ३० – ४५ सेंमी. लांब असते. इतर प्रदेशातील वानर १२ – १४ किग्रॅ. वजनाचे असतात.
वानराचीमुख्य वसती हिमालय ते कन्याकुमारी व श्रीलंका येथे असून पश्चिम वाळवंटाततो आढळत नाही. वानराच्या एकूण १४ पोटजाती आतापर्यंत आढळल्या आहेत. हिमालयातसु. ४,००० मी. उंचीवर जेथे नेहमी बर्फ पडते तेथे वानर राहतात. अतिशय थंडीपडली, तर ते कमी उंचीवर येतात. इतक्या उंचीवर उगवणाऱ्या सूचिपर्णीवृक्षांची पाने, फळे, फुले हे यांचे मुख्य खाणे आहे. डोंगराळ भागांतीलखडकावर व दऱ्यांतून पाण्याची उपलब्धता असेल तेथे ते वसती करतात.
तीर्थस्थळांच्याठिकाणी देवळे व पाण्याच्या टाक्या असतील तेथे वानरांचे कळप आढळतात. येथीलवानर आता इतके धीट झाले आहेत की, न भिता ते माणसांच्या हातांतील वस्तू वखाण्याचे पदार्थ हिसकावून घेतात. भल्या पहाटे वानरांची टोळी अन्न शोधार्थबाहेर पडते. एका कळपात तीस ते चाळीस वानर असतात. कळपात नर, माद्या व लहानपिले असतात. कळपाचा प्रमुख नर इतरांवर हुकमत गाजवतो. प्रमुख नर इतरांचे अंगसाफ करीत नाही पण स्वतःचे अंग इतरांकडून साफ करून घेतो. मादी माजावर आल्यावर अनेक नरांशी तिचा संबंध येतो. गर्भधारणेनंतर १७० दिवसांनी एक किंवा दोन पिले होतात. पिलाचे वजन ०.४० किग्रॅ.पेक्षाही कमी असते. पिलाची वाढ सात वर्षांपर्यंत होते. जन्मल्यानंतर पिलू आईच्या पोटाला घट्ट बिलगून तिच्याबरोबर हिंडते. सुमारे एक महिन्यानंतर ते आईपासून थोडे दूर हिंडू लागते. अगदी कोवळ्या वयात लैंगिक प्रवृत्तीकडे कल असतो. एखादी मादी नरापेक्षा जास्त ताकदवान असेल, तर ती इतरांवर हुकमत गाजवते.
पहा : नरवानर गण माकड.
दातार, म. चिं.
“