ऱ्हायझोबिएसी : सूक्ष्मजंतूच्या यूबॅक्टिरिएलीझ गणातील कुल. मृदेत आढळणाऱ्या ऱ्हायझोबियमग्रोबॅक्टिरियम या प्रजातींतील सूक्ष्मजंतू या कुलात समाविष्ट आहेत. नवीन वर्गीकरणानुसार या कुलात ऱ्हायझोबियम, बॅडिऱ्हायझोबियम, ग्रोबॅक्टिरियमफायलोबॅक्टिरियम अशा चार प्रजाती समाविष्ट आहेत.ऱ्हायझोबिएसी : (१) ऱ्हायझोबिया सूक्ष्मजंतूंमुळे निर्माण झालेल्या नमुनेदार ग्रंथी, (२) ॲग्रोबॅक्टिरियम ट्युमिफेसियन्स या सूक्ष्मजंतूंमूळे टोमॅटोच्या मुळावर निर्माण झालेल्या गाठी.वनस्पतींच्या मध्यत्वचेवर अतिवृद्धी घडवून हा या सूक्ष्मजंतूंचा विशेष गुणधर्म आहे. ऱ्हायझोबियम प्रजातीतील सूक्ष्मजंतू शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) वनस्पतींच्या मुळांवर ग्रंथी निर्माण करतात, तर ग्रोबॅक्टिरियम प्रजातीतील सूक्ष्मजंतू वनस्पतींच्या खोडांवर व मुळांवर गाठी निर्माण करतात.

ऱ्हायझोबियम : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू शलाकाकार, ग्रॅम-रंजक-अव्यक्त (एच्. सी. जे. ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग अल्कोहॉलाने धुतल्यानंतर टिकून न राहणारे). बीजाणू (सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) निर्माण न करणारे व सामान्यतः चर असून यांतील कशाभिकांची (हालचालीस उपयुक्त पडणाऱ्या धाग्यासारख्या वाढींची) रचना विभिन्न असते. काही जाती अचरही आहेत. या सूक्ष्मजंतूंचे एक्स (X), वाय (Y) या इंग्रजी अक्षरांसारखे तसेच तारका अगर गदेसारखे विविध आकारही विशेषतः मुळांवरील ग्रंथींवर आढळून येतात. ऱ्हायझोबिया नावानेही ते प्रसिद्ध आहेत. ते शिंबावंत वनस्पतींच्या मुळावर संक्रामण करून तेथे ग्रंथी निर्माण करतात. मुळांवरील केसांवाटे ते आत प्रवेश करतात. निर्माण झालेल्या ग्रंथी लांबट, गोल किंवा विविध आकारांच्या असून त्यांचा रंग लालसर असतो. वनस्पती व सूक्ष्मजंतू यांच्यामध्ये स्थापन झालेल्या ⇨सहजीवनातून हवेतील नायट्रोजन वायूचे मृदेत स्थिरीकरण होते. ऱ्हायझोबिया सूक्ष्मजंतू शिंबावंत वनस्पतींच्या मुळांवर निर्माण झालेल्या ग्रंथींत यास करतात आणि वनस्पतीपासून ऊर्जा प्राप्त करून घेतात. त्याचबरोबर हवेतील मातीत शिरलेला नायट्रोजन वायू शोषून घेऊन त्याची लवणे ग्रंथींत साठवून ठेवतात. वनस्पतींची नायट्रोजनाची गरज भागविण्यास ही लवणे उपयुक्त ठरतात. त्यामुळे या सहजीवनातून शिंबावंत वनस्पतींची वाढ चांगली होते. शिवाय उरलेली लवणे मृदेत मिसळली जाऊन त्यांचा उपयोग इतर पिकांना आणि मृदेतील सूक्ष्मजीवांना होतो. वाढलेली शिंबावंत वनस्पती न उपटता जमिनीतच गाडल्यास हेक्टरी सु. ५०० किग्रॅ. नायट्रोजन जमिनीस  प्राप्त होतो. विशिष्ट शिंबावंत वनस्पतींच्या मुळांवर संक्रामण करण्याच्या त्यांच्या गुणधर्मावरून या वनस्पतींची सात गटांत वर्गवारी केलेली आहे. पहिल्या सहा म्हणजे लसूणघास, ट्रायफोलिया, वाटाणा, ल्युपीन, सोयाबीन व चवळी या गटातील सूक्ष्मजंतू त्या त्या गटांतील वनस्पतींवरच संक्रामण करू शकतात. दोन किंवा अधिक गटांतील वनस्पतींवर संक्रामण करणाऱ्या ऱ्हायझोबियम सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण काउपी मिसंलेनी या सातव्या गटात केले जाते. या सूम्क्षजंतूंच्या ऱ्हा. मेलिलोटी, ऱ्हा. ट्रायफोली, ऱ्हा. लेग्युमिनोसेरम, ऱ्हा. फॅसिओली, ऱ्हा. जॅपोनिकम आणि ऱ्हा. ल्युपिनी अशा सहा जाती ओळखण्यात येतात.

ऱ्हायझोबियम सूक्ष्मजंतू मृदेमध्ये सामान्यतः आढळत असले, तरी विशिष्ट शिंबावंत वनस्पतींशी सहजीवन साधू शकणारा ऱ्हायझोबियम मृदेत नसण्याची विशेषतः नापिक जमिनीत शक्यता असते, म्हणून शिंबावंत वनस्पतींची लागवड करण्यापूर्वी बियाण्याला त्या वनस्पतीशी सहजीवन साधू शकणाऱ्या ऱ्हायझोबियमाची मात्रा देणे उपयुक्त ठरते. असे ऱ्हायझोबियम ऱ्हायझो किंवा जीवाणू खते या नावाने बाजारात विकली जातात. यामुळे रासायनिक खतात बचत होते व पीकही चांगले येते.

र्गीज मॅन्युअल ऑफ सिस्टेमॅटिक बॅक्टिरिऑलॉजी (खंड पहिला, १९८४) या ग्रंथातील नव्या वर्गीकरण पद्धतीत ऱ्हायझोबियम प्रजाती कोणत्याही गणात समाविष्ट नसून चौथ्या विभागात ग्रॅम-रंजक-अव्यक्त, ऑक्सिजीवी (जगण्यासाठी मुक्त ऑक्सिजनाची आवश्यकता असलेल्या) सूक्ष्मजंतूंमध्ये तिचा समावेश करण्यात आलेला आहे.

ॲग्रोबॅक्टिरियम : या प्रजातीत ग्रोबॅक्टिरियम ट्युमिफेसियन्स, ॲ. रुबी, . ऱ्हायझोजीनस आणि . रेडिओथॅक्टर या चार जाती समविष्ट असून पहिल्या तीन जाती वनस्पतींच्या बाबतीत रोगकारक आहेत. हे सूक्ष्मजंतू आकाराने अत्यंत लहान, शलाकाकार, ग्रॅम-रंजक-अव्यक्त, बीजाणू न निर्माण करणारे आणि चर असून कशाभिका सभोवार आढळतात. या प्रजातीची प्रातिनिधिक जात . ट्युसिफेसियन्स पॅरिस, डेझी, टोमॅटो वगैरे अनेक वनस्पतींवर गाठी निर्माण करतात. क्राऊन गॉल या नावाने हा रोग परिचित आहे. रुबीचा रोगप्रादुर्भाव रासबेरी व ब्लॅकबेरी यांवर होतो. . ऱ्हायझोजीनसमुळे वनस्पतीच्या मुळांवर गाठी येतात परंतु हे सहजीवन नसून रोगलक्षण आहे. [⟶ गाठी, वनस्पतींच्या].

रुईकर, स. के. गोडबोले, श्री. ह.