रोस्टबोरोव्हस्की, कारॉल हुबर्ट : (३ नोव्हेंबर १८७७-४ फेब्रुवारी १९३८). पोलिश नाटककार. जन्म रिब्‌ना येथे. संगीत व तत्त्वज्ञान ह्या विषयांचा अभ्यास केल्यानंतर तो रंगभूमीची प्रस्थापित परंपरा असलेल्या क्रेको येथे स्थायिक झाला (१९१४). त्याच्या आरंभीच्या नाट्यलेखनावर निसर्गवादाचा प्रभाव दिसून येतो. तथापि पुढे तो मानसशास्त्रीय अंगाने वैचारिक स्वरूपाची नाटके लिहू लागला. Judasz z Kariothu (१९१३), Kajus Cezar Kaligula (१९१७) आणि Niespodzianka हे त्रिनाट्य (१९२९, १९३०, १९३२) ह्यांचा त्याच्या नाट्यलेखनात अंतर्भाव होतो. मनुष्याचे ईश्वराची असलेले नाते हा विषय त्याच्या मनाला विशेष व्यापून असल्याचे दिसून येते.

क्रेको येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.