ब्रेडेरो, गेर्ब्रांट आड्रिआन्सन : (१६ मार्च १५८५ – २३ ऑगस्ट १६१८). डच कवी आणि नाटककार, जन्म ॲम्स्टरडॅममध्ये. औपचारिक शिक्षण त्याला फारसे मिळालेले नव्हते. Despaansche brabander (१६१७) ही त्याची सर्वश्रेष्ठ सुखात्मिका. एका स्पॅनिश पिकरेस्क कांदबरीवर ती आधारलेली आहे. ब्रेडेरोने उत्तम प्रहसनेही लिहिली आहेत. ‘द कॉमिक, ॲमरस अँड डिव्होट ग्रेट साँग बुक’ (१६२२, इं. शी.) ह्या नावाने त्याची वैविध्यपूर्ण भावकविता संगृहीत असून तीतून त्याच्यातील श्रेष्ठ कवी प्रत्ययास येतो.ॲम्स्टरडॅम येथेच तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.