बेऱ्हमपूर विद्यापीठ : ओरिसा राजयातील एक विद्यापीठ. हे विद्यापीठ २ जानेवारी १९६७ रोजी बेऱ्हमपूर येथे स्थापन झाले. विद्यापीठाचे स्वरूप् संलग्नक व अध्यापनात्मक आहे. त्याच्या अधिकारक्षेत्रात गंजाम, कोरापुट आणि फुलबानी (खोन्डामल्स) ह्या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. १९६६ मध्ये राजय विधिमंडळाने ओरिसा राजयात दक्षिण विभागासाठी बेऱ्हमपूर विद्यापीठ पश्चिम विभागासाठी संबळपूर विद्यापीठ अशी दोन विद्यापीठे स्थापन करण्याचे ठरविले. राज्यातील उच्च शिक्षणच्या गरजा भागविणे हा तयामागे हेतू होता. विद्यापीठ `भंजा विहार’ नामक परिसरात असून प्रख्यात ओडिया कवी उपेंद्र भंज (अठरावे शतक) यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या परिसरात त्यांचे नाव दिलेले आहे.
अधिसभा हे विद्यापीठाचे सर्वोच्च अधिकारमंडळ आहे. यात कुलगुरू, राजयाचे शिक्षण संचालक यांसारखे पदसिद्ध सभासद व काही निर्वाचित सभासद असतात. कार्यकारिणीत १३ सभासद (४ लियुक्तआणि ९ निर्वाचित) असतात. विद्यापीठाचे कारभारविषयक नियंत्रण हे मंडळ करते आणि विद्वत्सभा शैक्षणिक बाबींचे नियंत्रण करते. `प्राच्यविद्या’ पदवी प्राप्त झालेल्या व प्रथम वर्ष बी.ए.ची फक्त इंग्रजीतील परीखा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बी. ए. परीखेतील संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण झाल्यास ‘बीओएल्’ ही पदवी मिळते.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २९ संलग्न महाविद्यसलये असून त्यात वृत्तपत्रविद्या, इतिहास, राजयशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीविज्ञान, प्राणीविज्ञान, सागरविज्ञान, इ. अध्ययन व संशोधन विभाग तसेच कला, शिक्षण, विधी आणि वैद्यक ह्या प्रमुख विद्याशाखा आहेत. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना बहिःस्थ विद्यार्थी म्हणून परीखेस बसण्याची सोय आहे. १ जून-३१ मे असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून त्यात (१) जून-डिसेंबर व (२) जानेवारी-मे अशी दोन सत्रे आहेत. विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षांसाठी पण्मास परीखा पद्धती नुकतरच सुरू केली. पदवी परीखांसाठी ती नंतर सुरू करण्याचे ठरले होते (१९७७-७८).
विद्यापीठाच्या आवारातच आरोग्य केंद्र आहे. विद्यापीठातील सर्व संलग्न महाविद्यालयात व्यायामशाळा आहेत. विद्यापीठाच्या एकूण एकोणीस वसत्रिगृहांत १,६२० विद्यार्थी राहतात (१९७९-८०). विद्यापीठीय परिसरातील वसतिगृहात २३० विद्यार्थी व ५० विद्यार्थिनी राहण्याची सोय आहे (१९७९-८०).
विद्यापीठाचे उत्पन्न ५.६१ कोटी रू. व खर्च ६.५० कोटी रू होता (१९७९-८०). याच वर्षाचे विद्यापीठीय विकास योजनेखालील उत्पन्न ४.६३ कोटी रू. व खर्च ४.२५ रू. होता. विद्यापीठाच्या ग्रंथालयात सु. ३२,१०२ ग्रंथ आणि विद्यापीठात ११० अध्यापक व १४,४८८३ विद्यार्थी होते (१९७९-८०).
मिसार, म.व्यं.