बूलीयन बीजगणित : इंग्रज गणितज्ञ व तर्कशास्त्रज्ञ ⇨जॉर्ज बूल यांच्यावरूनच प्रस्तुत विषयाला बूलीयन बीजगणित असे नाव पडले आहे. बूल यांनी आधुनिक ⇨चिन्हांकित तर्कशास्त्राचा पाया घातला. तथापि त्यांनी तर्कशास्त्र हे एक गणितशास्त्राचा विभाग न मानता बीजगणितातील चिन्हे व तर्कशास्त्रामधील चिन्हे यांमधील साधर्म्य दाखवून दिले. बूल यांची तर्कशास्त्राच्या यांत्रिकीकरणाची पद्धत व त्यामध्ये ० आणि १ या चिन्हांचा वापर हीच बूलीयन बीजगणितातील पायाभूत मूलतत्वे म्हणता येतील. बूल यांच्या चिन्हांकित तर्कशास्त्रातील संकल्पनांचा व विशेषतः त्याच्यातील द्विमान कारकांचा (“आणि”, “अथवा” वगैरे) संगणकांच्या (गणक’यंत्रांच्या) मंडलांची रचना करण्यात पुष्कळच उपयोग करण्यात येतो. तसेच त्यांचा दूरध्वनी संदेशवहनामध्येही उपयोग करण्यात येतो.
व्याख्या : समजा स = {क, ख,………} हा एक कमीत कमी दोन भिन्न घटक असलेला संच आहे. या संचातील घटकांमध्ये खाली दिलेले संबंध व त्यांवर करण्यात येणारी कृत्ये यांच्या व्याख्या केलेल्या आहेत. (यातील संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘बीजगणित, अमूर्त’ व ‘संच सिध्दांत’या नोंदी पहाव्यात).
(१) द्विमान कृत्ये ⊕ व ⊙, [⊕व ⊙व यांच्याकरिता अधिकारी घटक O व I यांनी दर्शवू].
(२) एक एकमान कृत्य (समजा पूरकता, जे ‘/’ या चिन्हाने दर्शविले जाते).
(३) द्विमान संबंध (< या चिन्हाने दर्शवू).
हा संबंध
(अ) परावर्ती : क < क,
(आ) प्रतिसममित : क < ख, ख<क Û क = ख,
आणि (इ) संक्रमणीय : क<ख, ख < ग ⇨क [>] ग
असतो व तो पुढील अटी पाळतो :
(ई) सर्वव्यापी बंध: O < क < I.
(उ) सुसंगतता तत्त्व : क ⊙ख =क, क ⊕ ख= ख
क‘⊕ख‘= I, क ⊙ख‘ = ⊙⇨क<ख,
(१) व (२) मधील कृत्यांना कोष्टक क्र.१ मध्ये दिलेले गुणधर्म आहेत.
या कोष्टकातील गुणधर्म स्वतंत्र नाहीत व कमीत कमी गृहीतांची यादी निरनिराळ्या प्रकारे मांडणे शक्य आहे. अशा तऱ्हेची सोपी व सुटसुटीत यादी ई. व्ही. हंटिंग्टन या अमेरिकन गणिततज्ञांनी सुचविली आहे. हंटिंग्टन यांच्या मांडणीप्रमाणे खाली दिलेल्या चार संकल्पना, सहा गृहीतके व तीन व्याख्या यांनी बूलीयन बीजगणिताची व्याख्या करता येते :
चार संकल्पना : (१) कमीत कमी दोन भिन्न घटक असलेला संच स.
(२) एक द्विमान कृत्य (समजा ⊕ या चिन्हाने निर्देशित केलेले).
(३) एक एकमान कृत्य (‘/’ या चिन्हाने निर्देशित केलेले).
(४) एक तुल्यता व्दिमान संबंध ([=] या चिन्हाने निर्देशित केलेला).
कोष्टक क्र.१.
क, ख, ग, या कोणत्याही तीन घटकांकरीता बूलीयन बीजगणितातील कृत्यांना असणारे गुणधर्म.
गुणधर्म |
कृत्य ⊕ |
कृत्य ⊙ |
१)संवृत्तता २)क्रम निरपेक्षता ३)साहचर्य ४)वितरण ५)कृत्य निष्फलता ६)(अ)अविकारी घटकाचे अस्तित्व (आ)अविकारी घटकावरील कृत्ये ७)पूरकाचे अस्तित्व : जसे क‘∈ स हा क ∈ चा पूरक ८) द मॉर्गन यांचे नियम ९) शोषण नियम |
क ⊕ ख ∊ स क ⊕ ख = ख⊕क क ⊕(ख ⊕ ग)= (क ⊕ ख)⊕ ग= क ⊕ ख⊕ग क ⊕(ख ⊙ग)= (क ⊕ ख)⊙ (क ⊕ ग) क ⊕ क = क क⊕Ο= क = Ο⊕ क क ⊕I = I= I ⊕क क ⊕ क‘ = I (क⊕ख)‘ क⊕(क ⊙ख) = क |
क ⊙ख∊स क ⊙ख = ख ⊙क क ⊙ (ख ⊙ ग)= (क ⊙ख) ⊙ग= क ⊙ख ⊙ग क ⊙(ख ⊕ग)= (क ⊙ ख)⊕ (क ⊙ ग) क ⊙क = क क ⊙ I = क = I ⊙क क ⊙Ο = Ο = Ο⊙क क ⊙क‘ = O (क ⊙ख)‘= क‘ ⊕ख‘ क⊙ (क ⊕ ख) = क |
सहा गृहीतके : (१)⊕या कृत्याकरिता संवृतता.
(२) ‘/’ या कृत्याकरिता संवृतता.
(३) ⊕या कृत्याकरिता क्रमनिरपेक्षता.
(४) साहचर्य (⊕ या कृत्याकरिता)
(५) ⊕ या कृत्याकरिता कृत्य निष्फलता नियम.
(६) (क‘⊕ख‘)’⊕(क‘⊕ख‘)’ [=] क
तीन व्याख्या : (१) विश्वव्यापी घटक I : क ⊕ क ‘ ≡ I ∀क ∊ स
(२) रिक्त घटक 0 : (क ⊕ क‘)’ ≡ O ∀क ∊ स
(३) एक द्विमान कारक O :
क O ख = (क‘⊕ख‘)’ ∀क, ख∈स
एक सोपे उदाहरण : समजा स = {क, ख, ग, घ } हा एक संच आहे व त्यातील घटकांवर करण्यात येणाऱ्या ⊕ व ⊙ह्या दोन कृत्यांची व्याख्या कोष्टक क्र २ व ३मध्ये दाखविल्याप्रमाणे केली आहे.
वर दिलेली बूलीयन बीजगणिताची व्याख्या पडताळून पाहिल्यास {स, ⊕, ⊙ } हे एक बूलीयन बीजगणित आहे, हे सहज दिसून येईल.
संच सिद्धांत व बूलीयन बीजगणित : संचांचे बीजगणित हे एक बूलीयन बीजगणित आहे हे कोष्टक क्र ४वरून दिसून येईल.
व्हेन आकृत्या [→ संच सिद्धांत] काढून संच बीजगणित हे बूलीयन बीजगणित आहे, हे पडताळून पाहता येईल.
कोष्टक क्र २ ⊕ या कृत्याची व्याख्या
⊕ |
क |
ख |
ग |
घ |
क |
क |
क |
क |
क |
ख |
क |
ख |
क |
ख |
ग |
क |
क |
ग |
ग |
घ |
क |
ख |
ग |
घ |
कोष्टक क्र ३.⊙या कृत्याची व्याख्या
⊙ |
क |
ख |
ग |
घ |
क |
क |
ख |
ग |
घ |
ख |
ख |
ख |
घ |
घ |
ग |
ग |
घ |
ग |
घ |
घ |
घ |
घ |
घ |
घ |
तर्कशास्त्र व बूलीयन बीजगणित : तर्कशास्त्रसामध्ये सरल विधाने (उदा., ७ जून १९८१ या दिवशी निवडणूक झाली) व संयुक्त विधाने (दोन सरल विधाने ‘आणि’, ‘अथवा’ अशा अव्ययांनी जोडलेली उदा., रात्री पाऊस पडला आणि आज मी वाचनालयात गेलो होतो) यांचा विचार करण्यात येतो. या विधानांचा सत्यता संच तयार करण्यात येतो. अशा संचांचे बीजगणित हे बूलीयन बीजगणित असते हे कोष्टक क्र५ वरून दिसून येईल.
कोष्टक क्र ४ संचांचे बीजगणित व बूलीयन बीजगणित यांतील साधर्म्य
संचांचे बीजगणित |
बूलीयन बीजगणित |
१. संच घटक असलेला संचांचा समुच्चय |
संचाचा घटक |
२. द्विमान कृत्य U (संयोग) |
द्विमान कृत्य ⊕ |
३. एकमान कृत्य ‘/’ (पूरकता) |
एकमान कृत्य ‘/’ |
४. विश्वसंच वि |
विश्वव्यापी घटक I |
५. रिक्तसंच ∅ |
रिक्तघटक 0 |
६. द्विमान कृत्य ∩ (छेदन) |
द्विमान कृत्य ⊙ |
७. तुल्यता संबंध = |
तुल्यता संबंध |=| |
८. द्विमान संबंध: अंतर्भूत असणे ≼ |
द्विमान संबंध |≼| |
कोष्टक क्र ५ तर्कशास्त्राचे बीजगणित व बूलीयन बीजगणित यांतील साधर्म्य.
तर्कशास्त्राचे बीजगणित |
बूलीयन बीजगणित |
१. विधानाचा सत्यता संच |
संचाचा घटक |
२. सत्यता संचांचा संयोग U |
द्विमान कृत्य ⊕ |
३. सत्यता संचांचा छेद ∩ |
द्विमान कृत्य ⊙ |
४. सत्यता संचाची पूरकता (‘ ) |
एकमान कृत्य ‘/’ |
५. पुनरुक्तीचा सत्यता संच |
विश्वव्यापी घटक I |
६. व्याघाताचा सत्यता संच ∅ |
रिक्त घटक |
७. तुल्यता संबंध (º) |
तुल्यता संबंध |º| |
संख्या संचावरील बीजगणित व बूलीयन बीजगणित : सर्वांना परिचित असलेले संख्या संचावरील ⇨बीजगणित व बूलीयन बीजगणित यांमधील फरक विशेष लक्षणीय आहे.
(१) नेहमीच्या परिचित बीजगणितात + या कृत्याचे × या कृत्यावर वितरण होत नाही., तर बूलीयन बीजगणितात ⊕ या कृत्याचे ⊙या कृत्यावर व ⊙या कृत्याचे ⊕ या कृत्यावर वितरण होते.
(2) नेहमीच्या बीजगणितात कृत्य निष्फलता नियम असतो.
(३) तसेच बूलीयन बीजगणितातील गुणधर्मांच्या कोष्टकांमधील (कोष्टक क्र.१ मधील) ६ (आ.) ७, ८, ९ यांतील गुणधर्मांशी सदृश गुणधर्म नेहमीच्या बीजगणितात आढळत नाहीत.
(४) संख्या संचावरील बीजगणित हे संपूर्ण क्रमित असते परंतु बूलीयन बीजगणितात हा गुणधर्म आढळत नाही म्हणजेच सत् संख्या संचामध्ये [→संख्या] क आणि ख या दोन संख्या असल्यास (अ) क < ख किंवा (आ) क = ख किंवा (इ) क> ख. अशा तऱ्हेचा गुणधर्म बूलीयन बीजगणितात आढळत नाही.
बूलीयन बीजगणित हे आंशिक क्रमित आहे. तसेच ते परिचित गणितापेक्षा गुणधर्मांच्या बाबतीत जास्त सममित आहे. उदा., बूलीयन बीजगणितातील एखादे विधान खरे असेल, तर एकाच वेळी (अ) ⊕व⊙या कृत्याची अदलाबदल आणि (आ) विश्वव्यापी घटक I व रि क्त घटक O यांची अदलाबदल केली, तर निष्पन्न होणारे विधानही खरे असते. यालाच ⇨ द्वित्व तत्त्व म्हणतात. द्वित्व तत्वाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे:
(१) क ⊕O = क Û क ⊙ I = क
(२) क⊕I = I Ûक ⊙ 0 = 0
(३) क⊕क‘ = I Ûक ⊙क‘ = 0
दोन घटक असलेल्या संचाचे बीजगणित : समजा स = {०, १} हा एक दोन घटकांचा संच आहे. येथे ० व १ या अंकगणितातील संख्या नाहीत ती फक्त दोन घटकांकरिता चिन्हे आहेत. आता या संचावर कोष्टक क्र.६ व ७ मध्ये दिल्याप्रमाणे दोन कृत्यांची ( + व .) व्याख्या केलेली आहे,
कोष्टक क्र. ६. |
कोष्टक क्र. ७. | ||||||||||||||||||||||||
|
|
या कोष्टकात दिलेल्या व्याख्या वापरून खालील गुणधर्म सहज पडताळून पाहता येतील.
(१) संवृतता : दोन्ही कृत्यांकरिता संच संवृत्त आहे.
(२) + व . ही दोन्ही कृत्ये क्रमनिरपेक्ष आहेत.
(३) दोन्ही कृत्यांना साहचर्य नियम लागू आहे.
(४) + या कृत्याचे . या कृत्यावर वितरण, तसेच . या कृत्याचे + या कृत्यावर वितरण शक्य आहे.
(५) कृत्य निष्फलता नियम पाळला जातो.
(६) दोन्ही कृत्यांकरिता अविकारी घटक उपलब्ध आहे.
(७) प्रत्येक घटकाला पूरक घटक उपलब्ध आहे.
(८) द मॉर्गन यांचे नियमही पडताळून पाहता येतात.
(९) शोषण नियम अस्तित्वात आहे.
या गुणधर्मामुळे संच स = {०,१} आणि कृत्ये + व . यांनी एक बूलीयन बीजगणित तयार होते, हे सहज लक्षात येईल.
स्विचिंग मंडलांचे बीजगणित : समजा आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे क व ख यांना जोडणारे आणि मध्ये एक स्विच असलेले
एक मंडल आहे. स्विचाची अवस्था (बंद किंवा चालू) क्ष ने दर्शविली आहे. क्ष ला दोनच मूल्ये आहेत. चालू आणि बंद या अवस्था आपण१ व ० या चिन्हांनी दर्शवू. म्हणजेच क्ष = १ याचा अर्थ स्विच चालू. (म्हणजे विद्युत् प्रवाह चालू) आणि क्ष = ० याचा अर्थ स्विच बंद (म्हणजे विद्युत् प्रवाह बंद). आता ज्या मंडलामध्ये दोन स्विच आहेत अशा मंडलाचा विचार करू. यामध्ये दोनच शक्यता आहेत : (१) दोन्ही स्विच एकसरीत जोडलेले आहेत किंवा (२) अनेक सरीत जोडलेले आहेत. (आ. २).
या दोन स्विचांची असस्था क्ष आणि य या अक्षरांनी दर्शवू. क्ष आणि य हे दोन्ही चल ० व १ ही मूल्ये स्वतंत्र रीत्या धारण करू शकतात. आ. १ मध्ये दोन्ही स्विच चालू असताना विद्युत् प्रवाह वाहतो. अशावेळी या दोन एकसरीतील स्विचाची अवस्था आपण क्ष.य किंवा क्षय अशी दर्शवू. म्हणजेच त्याचे कोष्टक कोष्टक क्र. ८ मध्ये दर्शविल्याप्रमाणे होईल.
|
|
य |
|
|
. |
० |
१ |
क्ष |
० |
० |
० |
१ |
० |
१ |
किंवा
क्ष |
य |
क्ष.य |
१ |
१ |
१ |
० |
१ |
० |
० |
० |
० |
१ |
० |
० |
दोन स्विच अनेकसरीत जोडलेले असतील तेव्हा त्यांची अवस्था क्ष+य अशी दर्शवू. हे उघडच आहे की, दोन्ही स्विच चालू असताना किंवा दोहोंपैकी एक चालू असताना प्रवाह चालू राहील. हीच गोष्ट कोष्टक क्रं ९ वरून स्पष्ट होईल.
|
|
य |
|
|
+ |
० |
१ |
क्ष |
० |
० |
१ |
१ |
१ |
१ |
किंवा
क्ष |
य |
क्ष.य |
१ |
१ |
१ |
० |
० |
१ |
० |
० |
० |
० |
१ |
१ |
म्हणजेच ज्याचे घटक बंद व चालू या दोन अवस्था दाखवितात. असा संच स = {०, १} आणि अनेक सरी किंवा एकसरी जोडणी +व . या कृत्यांनी दर्शविली जाते. हे एक बूलियन बीजगणित आहे, हे पडताळून पाहता येईल. स्विंचग मंडलाचे बीजगणित व बूलियन बीजगणित यांतील साम्य कोष्टक क्र १० वरून स्पष्ट होईल.
कोष्टक क्र. १०. स्विचांचे बीजगणित व बूलीयन बीजगणित यांतील साम्य
|
स्विचांचे बीजगणित |
बूलीयन बीजगणित |
१ |
स्विचाची अवस्था |
संचाचा घटक |
२ |
स्विच बंद (०या चिन्हाने दर्शविलेली अवस्था) |
० |
३ |
स्विच चालू (१ ने दर्शविलेली अवस्था) |
१ |
४ |
अनेकसरी जोडणी (+ने दर्शविलेली) |
+ |
५ |
एकसरी जोडणी (.ने दर्शविलेली). |
|
६ |
समांतर जोडणीमध्ये‘बंद’अवस्था |
० (+ या कृत्याकरिता अविकारी घटक) |
७ |
एकसरी जोडणीमध्ये‘चालू’अवस्था |
१(. या कृत्याकरिता अविकारी घटक म्हणजेच विश्वव्यापी घटक) |
८ |
‘बंद’चा पूरक‘चालू’ |
१ |
९ |
‘चालू’चा पूरक‘बंद’ |
० |
पहा : इलेक्ट्रॉनिक स्विच मंडले बीजगणित, अमूर्त संच सिद्धांत
संदर्भ 1. Arnold, B.H.Logic and Boolean Algebra, Englowood Cliffs, N.J., 1963.
2. Goodstein, R.L. Boolean Algebra, Oxford, 1963.
3. Hoerns, G. Heilweil, M.F. Introduction to Boolean Algebra and Logic Design, New York, 1964.
4. Hohn, f.E. Applied Boolean Algebra, New York, 1966
5.Neimstein, S.M. Keim, A.Fundamentals of Degltal Computers, new York, 1965.
ओक, स. ज.
“