बिल्मा मरूद्यान : नायजर देशात सहारा वाळवंटी भागात असलेले हे मरूद्यान, चॅड सरोवराच्या उत्तरेस आहे. त्यास ‘गारूचे मरूद्यान’ असेही म्हणतात. येथे मुख्यतः टिब्बू व कानुरी जमातींच्या लोकांची वस्ती आहे. येथे मिठाचे प्रचंड साठे आढळतात. हे सर्व मीठ शेजारच्या आफ्रिकन देशांच्या धान्याच्या बदल्यात निर्यात केले जाते. 

लिमये, दि. ह.