बाप्तिस्मा : ख्रिस्ती धर्मातील अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक असा दीक्षाविधीचा संस्कार. हा संस्कार झाल्यावरच व्यक्ती खऱ्या अर्थाने ख्रिस्ती होते. बालकाचा बाप्तिस्मा कोणत्या वयात करावा, याबाबत निश्चित असे नियम नाहीत तथापि मुलांच्या जन्मानंतर शक्य तितक्या लवकर तो करण्याची रूढी आहे. काही ख्रिस्ती धर्मपंथात व्यक्ती प्रौढ झाल्यावर बाप्तिस्मा करतात. बाप्तिस्मा दोन प्रकारे करतात : (१) पवित्र जलात तीनदा बुडवून व (२) पवित्र जलाचे डोक्यावर तीनदा प्रोक्षण करून. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या त्रयदेवाच्या [⟶ट्रिनिटी] नावाने बाप्तिस्मा केला जातो, त्याचा निदर्शक असा हा विधी आहे.

पहा : ख्रिस्ती धर्म (कर्मकांड व संस्कार) संस्कार (ख्रिस्ती).

संदर्भ : 1. Cullmann, Oscar, Baptism in the New Testament, Naperville, III., 1958.

             2. Flemington, W.F. The New Testament Doctrine of Baptism, New York, 1949.

             3. Stone, Darweel, Holy Baptism, London, 1901.

आयरन, जे डब्ल्यू. (इं.) साळवी, प्रमिला (म.).