बादरायण : (इ.स.चे दुसरे शतक). वेदान्तसूत्रांचा म्हणजे ⇨ब्रह्मसूत्रांचा कर्ता. बादरायण व्यास ह्या नावानेही ओळखला जातो. बादरायणाचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि तो इ.स. चे दुसरे शतक असा असावा. जैमिनीय पूर्वमीमांसा सूत्रांतही त्याचा उल्लेख येतो. बादरायण, व्यास आणि महाभारत-कर्ता, कृष्णद्वैपायन व्यास हे एकच होत, असे वेबरसारख्या काही विद्वानांनी मानले तथापि ते बरोबर नसल्याचा निर्वाळा माक्स म्यूलरसारख्या विद्वानांनी दिलेला आहे.

जोशी, लक्ष्माणशास्त्री.