मच्छीमारीनौका : मच्छीमारीसाठी विविध प्रकारच्या नौका वापरण्यात येतात. हे प्रकार सामान्यतः पाण्याच्या खोलीवर अवलंबून असतात. वल्ह्यांनी, शिडांनी व एंजिनावर चालणाऱ्या यंत्रसज्ज नौका असेही यांचे वर्गीकरण करण्यात येते. पकडावयाच्या माशांच्या प्रकारांनुसार या नौकांत विविध प्रकारची जाळी वापरण्यात येतात. देवमाशांसारखे प्रचंड जलचर पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारची जहाजे बांधावी लागतात. मच्छीमारी नौकांचे प्रकार व त्यांमध्ये वापरण्यात येणारी विविध प्रकारची जाळी यांचे तपशीलवार वर्णन ‘मत्स्योद्योग’ या नोंदीत दिलेले आहे.

जमदाडे, ज. वि.