भेंडवृक्ष : (इं. कॉर्कवुड, पिथ ट्री, पाँड अचपल, अ लिगेटर अपल, मंकी अतपल लॅ. अ नोना पॅलुस्ट्रिस कुल अ नोनेसी). सुमारे १० – १४ मी. उंचीचा हा सदापर्णीवृक्ष अमेरिकेतील उष्ण प्रदेशात व वेस्ट इंडीजमध्ये ओढे व ओहोळ यांच्या काठाने वा दलदलीच्या जवळपास आढळतो. पाने साधी, एकाआड एक, मऊ व वरून चकाकणारी पण खाली फिकट, आयत-अंडाकृती टोकदार फुले सुगंधी, फिकट पांढरी किंवा फिकट हिरवट पिवळी आतून तळाशी बहुधा गडद तांबडी. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ अतनोनेसीमध्ये (सीताफल कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. घोसफळ मांसल, गुळगुळित, प्रथम हिरवे नंतर पिवळट मगज (गर) अखाद्य. बिया अनेक व सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या). लाकूड हलके व भेंडाप्रमाणे हे बुचाऐवजी वापरता येत असल्याने त्याचे कॉर्कवुड हे इंग्रजी नाव पडले आहे. अर्थात कॉर्कवुड हे नाव अनेक वनस्पतींना दिलेले आढळते. भारतात हा वृक्ष आढळत असल्याचा उल्लेख नाही.
वैद्य, प्र. भ.
“