बर्नपूर :पश्चिम बंगाल राज्याच्या बरद्वान जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या २८,९२४ (१९७१). हे दामोदर खोऱ्यातील राणीगंज कोळसाक्षेत्रात, कलकत्त्याच्या वायव्येस सु. २१२ किमी., दामोदर नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. हे आसनसोलच्या नैऋत्येस तीन किमी. वर असून पुरूलिया, धनबाद व दुर्गापूर या शहरांशी लोहमार्गाने व रस्त्यांनी जोडलेले आहे. येथे ‘इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी’ (इस्को) हा सरकारी क्षेत्रातील मोठा कारखाना त्याचप्रमाणे एक खत कारखाना असून रेल्वे डबे व वाघिणी यांचेही उत्पादन होते.

अनपट, रा. ल.