फ्रिश , रांगनार : (३ मार्च १८९५ – ३१ जानेवारी १९७३ ). प्रख्यात नॉर्वेजियन अर्थशास्त्र ज्ञ . १९६९ मध्ये प्रथमच सुरू झालेले अर्थशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक त्याला व ⇨ यान टिनबर्जेन ला वि भागून मिळाले . रांगनार फ्रिश सो न्याचांदीचे दागिने घडविणाऱ्याचा मुलगा . आपल्या कुटुंबात चालत आलेल्या व्यवसायात पारंगत होत असताना ऑस्लो विद्यापीठात तो अर्थशास्त्रा चे ही धडे घेत होता . १९१९ मध्ये पदवी मिळाल्यावर अर्थशास्त्र व गणित या विषयांच्या अधिक अभ्यासासाठी तो परदेशी गेला . तीन वर्षे त्याचे फ्रान्समध्ये वास्तव्य होते . गणित – संख्या शास्त्राशी निगडित असलेल्या विषयांवर त्याने १९२६ मध्ये ऑस्लो विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवि ली . त्यानंतर त्याने देशोदेशीच्या विद्यापीठां त अर्थशास्त्रविषयक संशोधनात गणित – संख्या शास्त्राचा कसा वापर करावा , या आपल्या आवडत्या विषयावर व्याख्याने दिली . ‘ इकॉनॉमेट्रिक्स ’( अर्थमिती ) हा शब्द फ्रिशनेच रूढ केला . १९३१ मध्ये ऑस्लो विद्यापीठात त्याची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली . तेथून तो १९६५ साली निवृत्त झाला . १९७३ मध्ये निधन होईपर्यंत त्यांचे संशोधन अविरत चालू होते. फ्रिश अर्थमितीचा पुरस्कर्ता होता .
अर्थशास्त्रीय संकल्पनांतील संदिग्धता काढून टाकून त्यांना नैसर्गिक शास्त्रांतील सिद्धांतां प्रमाणे निश्चित व ठराविक स्वरूप देण्यासाठी गणितीय पद्धती व संख्याशास्त्र यांचा वापर आवश्यक आहे , असे त्याचे ठाम मत होते . अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांना त्याने सुटसुटीत समीकरणांचे रूप दिले . गतिमान उत्पादन सिद्धांताच्याच अनेक बाजूंचा त्याने सखोल विचार केला आणि उत्पादनाचे पर्याप्तीकरण सिद्ध करण्यासाठी गणितीय पद्धतीचा अवलंब करणारी ‘ मॅथॅमॅटिकल प्रोग्रॅमिंग ’ ही पद्धती अर्थशास्त्रात रूढ केली . अर्थकारणात भविष्यकालीन धोरणांचा विचार करताना अर्थमितीय प्रतिमाने उपयुक्त ठरतात , हे त्याने सिद्ध केले . गणिताच्या आधाराने नियोजन प्रतिमाने तयार करताना त्याने संगणन पद्धतीचा उपयोग केला .
⇨ निवेश उत्पाद विश्लेषणा ला फ्रिशने नवी दिशा दिली . विकसनशील देशांना उपयोगी पडतील , अशी प्रतिमाने निर्माण करताना त्याने पूर्व यूरोपीय साम्यवादी देशातील नियोजन पद्धती मीमांसेत विशेष रस घेतला . रशियाने अर्थशास्त्रीय संशोधनासंबंधी १९६१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात फ्रिशच्या आर्थिक नियोजन प्रतिमानावरील प्रदीर्घ लेखाचा समावेश केला आहे .
फ्रिशचे लक्ष १९३० मधी ल आर्थिक महामंदीच्या काळात साकलिक अर्थशास्त्रीय समस्यांकडे वळले . साकलिक अर्थशास्त्रीय संकल्पनांच्या आधारे त्याने गतिमान व्यापारचक्र प्रतिमाने तयार केली . महामंदी रोखण्यासाठी त्याने सुचविलेल्या उपाययोजना आणि ग्रेट ब्रिटन व अन्य देशांत नंतरच्या काळात विकास पावलेल्या केन्सप्रणीत कल्पना यांत विलक्षण साम्य असल्याचे दिसून येते . महामंदीनंतरच्या व दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अनेक देशांनी अवलंबिलेल्या आर्थिक धोरणांवर फ्रिशच्या विचांराचा प्रभाव जाणवतो . आर्थिक धोरणास दिशा लावण्याच्या बाबतीत त्याचे सैद्धांतिक विचार नेहमीच उपकारक ठरले .
अर्थशास्त्राच्या अनेक क्षेत्रांत फ्रिशने महत्वाची भर घातली . आर्थिक कल्याण , आंतरराष्ट्रीय व्यापार , लोकसंख्या सिद्धांत , निर्देशांक , अल्पाधिकार अशा विविध विषयांवर त्याने लिखाण केले . अर्थमितीचा प्रसार करण्यासाठी त्याने १९३१ मध्ये ‘ इकॉनॉमे ट्रिक सोसायटी ’ स्थापन केली आणि इकॉनॉमे ट्रिका या सुप्रसिद्ध पत्रिकेचे १९३३ ते १९५५ या काळात संपादन केले . भारत , संयु क्त अरब प्रजासत्ताक आदी देशां त त्याने सरकारचा आर्थिक सल्लागार म्हणून काम केले . संशोधनकार्यात तो दिवसरात्र निमग्न असे . त्याने हाती घेतलेल्या प्रचंड उपक्रमाकडे केवळ दृष्टिक्षेप टाकला , तरी त्याचा कामाचा झपाटा किती विलक्षण होता याची साक्ष पटते . त्याने हाती घेतलेले अनेक उपक्रम अपुरे राहिले . आपले सिद्धांत गणितीय व संख्याशास्त्रीय पद्धतींनी मां ड ल्यामुळे त्याचे अनेक लेख किचकट , अगम्य वाटतात . असे असले , तरी त्याच्या संशोधनाचा अर्वाची न अर्थशास्त्रावर खोल प्रभाव पडल्याचे दिसते . गेल्या काही दशकांत अर्थशास्त्राने जी झेप घेतली आहे , तीत फ्रिशचा मोठा वाटा आहे .
पहा : अर्थमिती .
भेण्डे , सुभाष
“