फ्रिझियन भाषा – साहित्य  :  फ्रिझियन ही इंडो – युरापिअन भाषाकुटुंबातील जर्मानिक गटाच्या पश्चिम जर्मानिक शाखेतील एक भाषा आहे .  ऐतिहासिक दृष्टीने प्राचीन इंग्रजी शी तिचा अगदी जवळचा संबंध आहे .

 पूर्व फ्रिझियन ,  पश्चिम फ्रिझियन आणि उत्तर फ्रिझियन ह्या तिच्या पोटभाषा .  त्यांपैकी पूर्व फ्रिझियन ही ओल्डेनबर्गच्या  ( प .  जर्मनी )  प श्चि मेकडील झाटरलंड ह्या भागात बोलली जाते ,  तर पश्चिम फ्रिझियन ही नेदर्लंड्सच्या फ्री झ् ‌ लॅंड नावाच्या प्रांतात प्रचलित आहे .  फ्रिझियन भाषा बोलणारे सर्वाधिक लोक  ( सु .  तीन लाख )  ह्या प्रांतात आहेत .  येथील एक अधिकृत भाषा म्हणून नेदर्लंड्स सरकारने जिला मान्यता दिलेली आहे .  श्लेस्विगच्या  ( प .  जर्मनी )  पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेशात ,  तसेच फर ,  आम्‌रुम ,  हेल्गोलँड आणि हालिगन बेटांवर उत्तर फ्रिझियनचा वापर केला जातो .

  

 फ्रिझियन भाषिकांची एकूण संख्या अदमासे साडेतीन लाख आहे .   

 लेलकर ,  ना .  गो .

    साहित्य  :  फ्रिझियन भाषेतील आरंभीच्या साहित्यात राजे आणि वीरपुरुष ह्यांच्या गुणगौरवार्थ रचिलेल्या गीतांचा समावेश होतो .  ही गीते चारणांकडून गायिली जात असत आणि अशा चारणांची परंपरा इसवी सनाच्या आठ व्या शतकापर्यंत तरी कमीअधिक प्रमाणात होती ,  असे दिसून येते .  तथापि ही गीते आज उपलब्ध नाहीत .  अकरा व्या शतकापासूनच्या फ्रिझियन विधिसंहिता आणि विधिविषयक साहित्य मात्र मिळते .  त्यात आढळणारी अनुप्रासयुक्त रचना ,  तसेच अनेकदा दिसून येणारी काव्यात्मकता ह्यांवरून प्राचीन फ्रिझियन कवितेची थोडीशी कल्पना येऊ शकते .

  

 बहुसंख्य फ्रिझियन भाषिकांचा फ्री झ्‌लँड हा प्रदेश १५७९ मध्ये उत्रेक्त राजाला  ( यूनियन ऑफ उत्रेक्त )  जोडला गेला .  परकीय वर्चस्वामुळे फ्रिझियन भाषा – साहित्याची पीछेहाट होणे स्वाभाविक होते . ह्या अवनतावस्थेच्या पा र्श्व भूमीवर गिस्‌बर्ट जॅपिक्‌स  ( १६०३ – ६६ )  हा कवी   उदयाला आला .  आपल्या श्रेष्ठ काव्यरचनेने त्याने फ्रिझियनला एक वाङ्‌मयीन भाषा म्हणून पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली .  उत्कट प्रेमकवितांबरोबर धार्मिक स्वरूपाची काव्यरचनाही जॅपिक्‌सने केलेली आहे .  भावनेचा सच्चेपणा त्याच्या कवितेतून प्रत्ययास येत असला ,  तरी त्याच्या काव्यशैलीत ,  अत्यालंकरणाची बरोक प्रवृत्ती काही प्रमाणात दिसून येते .  अठराव्या शतकात गिस्‌बर्ट जॅपिक्‌स हा अनेक फ्रिझियन कवींचे स्फूर्तिस्थान बनला .  अनेकांनी त्याचे अनुकरणही केले  तथापि एकंदरीने कवितेचा हा अवनतकाळच होता .  एकोणिसाव्या शतकातील फ्रिझियन साहित्यावर स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचा प्रभाव आढळतो .  हार्मेन सिट्रस्ट्रा  ( १८१७ – ६२ )  हा ह्या शतकातील एक विशेष उल्लेखनी य कवी .  प्राचीन जर्मानिक काव्यप्रकारांचे पुनरु ज्जीवन करण्याचा त्याने प्रयत्न केला .

  

    पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात ‘ यंग फ्रिझियन कम्यू निटी ’  आणि ‘ क्रि श्च न फ्रिझियन सोसायटी ’  अशा दोन सांस्कृतिक संस्थांची झालेली स्थापना फ्रिझियन साहित्याला उपकारक ठरली आणि एक नवे वाङ्‌ मयीन प्रबोधन अवतरले .  शेक्सपिअर ,  शेली ,  मोल्येर आणि सेंट ऑगस्टीन ह्यांचे साहित्य फ्रिझियन भाषेत अनु वादिले गेले .

  

    डाउवी काल्मा  (१८९६  –  १९५३ )  हा विसाव्या शतकातील एक थोर कवी आणि समीक्षक .  ‘ किंग आल्डगिलीस ’ ( १९२ ० )  ह्या इंग्रजी शीर्षकार्थ चे त्याचे पद्यनाटक उल्लेखनीय आहे .  ‘ किंग्ज ऑफ फ्रिझ्लँड ’ ( इं .  अर्थ .)  ह्या नावाने ,  निर्यमक वृत्तात ,  त्याने निर्मिलेल्या ऐतिहासिक नाट्यकृतींच्या मालेत ह्या नाटकाचा अंतभाव होतो .  ‘ डॉन ’  व ‘ साँ ग्ज ’ ( इं .  अर्थ .)  हे अनुक्रमे  १९२७  आणि  १९३६  मध्ये प्रसिद्ध झालेले त्याचे काव्यसंग्रहही उल्लेखनीय आहेत .  फेद्दे शूरर  (१८९८ –   )  ह्याने आपल्या कवितेतून धार्मिक आणि राष्ट्रीय स्वरूपाचे विषय समर्थपणे हाताळले .  ‘ सॅमसन ’ ( १९४५ ,  इं .  अर्थ .)  ह्या त्याच्या पद्यनाटकास गिस्‌बर्ट जॅपिक्‌स वाङ्‌मय पुरस्कार देण्यात आला .  ‘ द चर्न ’ ( इं .  अर्थ .)  ह्या त्याने काढलेल्या  (१९४६ )  वाङ्‌मयीन नियतकालिकाने अनेक महत्त्व पूर्ण फ्रिझियन साहित्यिकांना एकत्र आणले . १९४६  मध्ये बायबल चे फ्रिझियन भाषांतर प्रसिद्ध झाले .  मार्टेन बस्मी आणि सिमकी क्लूस्टरमान ह्यांनी कादंबरीलेखन केले .  ऑन वॉडमनच्या कवितेतून प्रयोगशील दृष्टिकोण दिसून येतो . १९६१  मध्ये काव्यरचनेत नवे प्रयोग करणाऱ्या कवींचा एक गट उदयास आला .  ‘ ऑन फो र विंड्‌ स ’ ( इं .  अर्थ .)  ह्या नावाने त्यांच्या काही कविता संगृहीत आहेत .

  

 कुलकर्णी ,  अ .  र .