फ्रॅंक सत्ता : मध्ययुगीन यूरोपातील जर्मॅनिक वंशाच्या लोकांची एक प्रबळ सत्ता . इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात फ्रॅंक लोक ऱ्हाईन नदीका ठ च्या ऱ्हाईन लॅंड ह्या प्रदेशात वसाहत करून राहत असत . त्यांच्यात तीन गट होते : सेलियन , रिपुरियन व चॅटी किंवा हेसियन . सेलियन ऱ्हाईनच्या उत्तरेकडे आणि रिपुरियन दक्षिणेकडे राहत . चॅटींच्या स्थानाविषयी स्पष्ट उल्लेख मिळत नाही . हे गट स्वतंत्ररीत्या विकसित झाले . सुरुवातीस त्यांनी रोमन सावर्मौमत्व मान्य केले हो ते . त्यांच्यातील अनेकांनी रोमन सैन्यात दाखल होऊन युद्धांतही भाग घेतल्याचा उल्लेख आढळतो . पुढे त्यांनी संयुक्तपणे ⇨ गॉ ल वर हल्ले केले आणि ल्वार नदीच्या उत्तरेकडील गॉलचा बराच भाग पादाक्रांत केला ( इ . स . ४२८ – ४८० ).
रोमच्या पडत्या काळात फ्रॅंक सत्तेचा उदय झाला . त्याचा पहिला उल्लेखनीय राजा पहिला क्लो व्हिस ( कार . ४८१ – ५११ ) हा मे रों व्हिजिअन वंशातील असून इ . स . ४८६ मध्ये त्याने रोमन सेनानी सा यॅ ग्रिअस याचा पराभव करून ल्वा र प्रांत मिळविला आणि फ्रॅंक सत्तेचा पाया घातला . तसेच सेलियन व रिपुरियन यांत कायमचे ऐक्य घडवून आणले . ॲलिमॅनी टो ळ्यां चा इ . स . ४९८ मध्ये पराभव करून ब र्गंडी , ब व्हेरिया वगैरे प्रदेशा मिळविले . ह्याच मोहिमेत असताना त्याने खिस्ती धर्माचा स्वीकार केला . खिस्ती झाल्यामुळे क्लोव्हिसला चर्च चा पाठिंबा मिळून त्याने जर्मनी , फ्रान्स इ . प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्तापित कले आणि पॅरिस येथे राजधानी स्थापन केली . त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चार मुलांत राज्याची वाटणी झाली . त्यामुळे फ्रॅंक सत्ता कमकुवत होऊन इ . स . ७५२ मध्ये मेरो र्व्हि जिअन वंशाची सत्ता संपु ष्टा त येऊन कॅ रो लिंजिअन घराणे सत्तारूढ झाले . हे घराणे जर्मन असून वंशपरंपरेने ऑस्ट्रे झाच्या फ्रॅंक राजसत्तेशी संबंधित होते . इ . स . ७५२ मध्ये तिसरा पेपिन ( पेपिन द शॉर्ट – बु टका पेपिन – कार . ७१४ – ६८ ) यास फ्रॅंक राजा म्हणनू निवडण्यात आले . इ . स . ७५४ ते ७५६ मध्ये त्यांने लाँबर्डीचा पराभव करून पोपला वाचविले . पिरेनीज पर्वतांवर कब्जा मिळवून त्याने फ्रॅंक सत्ता अधिकच मजबूत व सुरक्षित केली . त्यांच्यानंतर त्याचा मुल गा ⇨ शा र्लमे न ( कार . ७६८ – ८१४ ) गादीवर आला . हा सवर्श्रेष्ठ राजा होय . त्याने विद्यमान फ्रान्स – जर्मनीचा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात आणला आणि खिस्ती धमार्चा पुरस्कार व प्रचार केला . इ . स . ८०० मध्ये त्यास पोपने ‘ रोमन सम्राट ’ हा बहुमानदर्शक किताब देऊन राज्याभिषेक केला . पवित्र रोमन साम्राज्याची ही सुरुवात होय . शार्लमेनच्या मृ त्यु समयी फ्रँक सत्तेखाली जवळजवळ सर्व यूरोप खंड होता. शार्लमेननंतर त्याचा मुलगा पहिला लूई गादीवर आला तथापि व्हर्डनच्या तहान्वये ( इ . स . ८४३ ) लूईचे साम्राज्य पहिला लोथेअर , लूई द जर्मन व चार्ल्स द बाल्ड या तीन मुलांनी वाटून घेतले . लोथेअरकडे इटली आणि जर्मनीचा काही भा ग व स म्राटपद आले लूई द जर्मनला जर्मनी मिळाला आणि चार्ल्स द बाल्ड याच्या ताब्यात फ्रान्स आला . पुढे मे र्से नच्या तहाने ( इ . स . ८७० ) याही राज्यांचे आणखी विभाजन झाले . लोथेअरचा वंश अखेर निष्प्रभ ठरला . पश्चिमेकडील फ्रॅंक सत्ता चार्ल्स द बाल्डनंतर लवकरच संपुष्टात आली . इ . स . ८८४ मध्ये त्याचा पुतण्या चार्ल्स द फॅट गादीवर आला पण त्या च्या सरदा रां नी इ . स . ८८७ मध्ये त्यास पदच्युत केले . चार्ल्स द बाल्डचा मुलगा चार्ल्स ( चार्ल्स द सिम्पल – कार . ८९३ – ९२२ ) पाच वर्षांच्या यादवीनंतर गादीवर आला . त्यानंतरचे राजे नामघरी व दुर्बल निघाले आणि खरी सत्ता कॅपेट घराण्याकडे गेली . इ . स . ९८७ मध्ये चौथ्या लूईच्या मृत्यूनंतर ह्यू कॅपेट ( ह्यू द ग्रेट – कार . ९८७ – ९६ ) याच्याकडे राजसत्ता आली आणि स्वतंत्र फ्रॅंक सत्ता नष्ट झाली .
पश्चिमेकडील फ्रॅंक राज्यांतून फ्रान्स या राष्ट्राचा उदय झाला तर पूर्वेकडील फ्रॅंक राज्यांतून जर्मनीचा उदय झाला. फ्रॅंक म्हणजे स्वतंत्र असाही एक अर्थ मध्ययुगात व नंतरही प्रचलित होता . त्याचे मूळ फ्रॅंक लोकांच्या स्वभावविशेषात आढळते.
पहा : फ्रान्स ( इतिहास ).
संदर्भ : 1 . Lasko, Peter, Frankish Power, London, १९७१ .
2 . Wallace-Hadrill, J. M. The Barbarian West : 400 -1000 , London, 1967 .
देशपांडे , अरविंद