फोर्ट नॉक्स :अमेरिकेच्या संयुक्तसंस्थानांपैकी केंटकी राज्यातील एक प्रमुख शहर. सैनिकी तळ व सरकारी सुवर्णसंचयाच्या कोठारामुळे हे विशेष प्रसिद्धआहे. फोर्ट नॉक्स लूइसव्हिलच्या नैर्ऋत्येससु. ५०किमी. आहे लोकसंख्या ३७, ६०८ (१९७०).
हे शहर चिलखती दलाचे केंद्र (होम ऑफ आर्मर) मानले जाते. येथे पहिल्या महायुद्धकाळात १९१७मध्ये सैनिकी प्रशिक्षण छावणी-कँप नॉक्स-उघडण्यात आली. १९३२साली त्याचे मूळ नाव कँप नॉक्स बदलून फोर्ट नॉक्स करण्यात आले. दुसऱ्यामहायुद्धकाळात चिलखती दलाच्या पंधरांहून अधिक डिव्हिजनमधील सैनिकांना येथे प्रशिक्षण देण्यात आले. येथे गॉडमन हा लष्करी हवाईतळ आहे. १९३६मध्ये या शहरात अमेरिकेचा सरकारी सुवणसाठा ठेवण्याची सोय करण्यात आली. ग्रॅनाइट, पोलाद व काँक्रीट यांच्या साहाय्याने हे सुवर्णसाठ्याचे कोठार बांधलेले आहे. या कोठाराच्या तळघराचा दरवाजा २०टनांपेक्षा जास्त वजनाचा आहे. कोठारात अत्याधुनिक अशा क्लृप्त्यांची योजना केलेली आहे.
लिमये, दि. ह.