फेरोमोने :  प्राण्यांच्या शरीरातून स्‍त्र वणाऱ्या व त्याच जातीच्या प्राण्यांच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या स्‍त्रा वास फेरोमोन असे म्हणतात.  या प्रकारचे रासायनिक संदेशवहन  [ ⟶ प्राण्यांमधील संदेशवहन ]  पुष्कळ प्राण्यांत आढळते ,  असे अलीकडील संशोधनावरून दिसते. पूर्वीच्या या विषयावरील लिखाणात अशा रसायनास बाह्य हॉर्मोन  [ एक्टोहॉर्मोन ⟶ हॉर्मोने ]  म्हणत असत.  यापेक्षा जास्त अचूक असा  ‘ फेरोमोन ’  हा शब्द १९५९  सालापासून वापरात आला आहे.

  प्राण्यांच्या वर्तना वरी ल परिणाम :  एकाच जातीच्या प्राण्यातील आपापसातील रासायनिक स्रावाची देवाणघेवाण फेरोमोन या शब्दाने व्यक्त करता येते. कारण खरी हॉर्मोने प्राण्याच्या शरीरातील ग्रंथीपासून शरीरात तयार होतात व त्यांचा परिणाम प्राण्याच्या शरीरक्रियेवर होतो. याउलट फेरोमोने ही प्राण्याच्या शरीराच्या बाह्य भागावर निर्माण होतात व त्यांचा परिणाम त्याच जातीच्या इतर प्राण्यांच्या वर्तनावर होतो. हा परिणाम दोन प्रकारचा असू शकतो.  पहिल्या प्रकारात फेरोमोनाचा परिणाम ग्राहक प्राण्याच्या वर्तनावर तत्काल व परिवर्तनीय स्वरूपाचा असतो.  याला  ‘ मुक्तिकारक परिणाम ’  म्हणतात.  या परिणामात फेरोमोनामधील रासायनिक द्रव्य ग्राहकाच्या केंद्रीय तंत्रिका तंत्रावर  [ मज्जा संस्थेवर ⟶ तंत्रिका तंत्र ]  सरळ क्रिया करते. दुसऱ्या प्रकारात फेरोमोनामुळे ग्राहक प्राण्याच्या शरीरात शरीरक्रियात्मक घटनांची साखळी निर्माण होते.  याला  ‘ चेतक परिणाम ’  म्हणतात.  या शरीरक्रियात्मक घटनांमुळे ग्राहक प्राण्याच्या वर्तनावर निरनिराळे परिणाम होतात. उदा ., वाळवी  ( उधई )  या कीटकात प्रजोत्पादक कीटक,  शिपाई कीटक,  कामकरी कीटक अशा निरनिराळ्या जाती आहेत. यां पैकी प्रजोत्पादक कीटक व शिपाई कीटक हे आपल्या शरीरांतून जे स्राव बाहेर टाकतात ते जर इतर कीटकांनी खाल्ले , तर त्याचा परिणाम ग्राहक कीटकाच्या मेंदूजवळील कॉ र्पस ॲ लॅटम या अंतःस्रावी ग्रंथीवर  ( जिचा स्‍त्रा व  –  हॉर्मोन  – सरळ रक्तात मिसळतो अशा वाहिनीविहीन ग्रंथीवर )  होतो .  ही ग्रंथी प्राण्याच्या प्रभेदनास  ( श्रमविभागणीच्या विकासामुळे ऊतकांच्या – पेशीसमूहांच्या – अथवा अवयवयांच्या संरचनेत बदल होण्यास )  जबाबदार असते . या ग्रंथीवर स्‍त्रा वाच्या होणाऱ्या परिणामामुळे हे कीटक प्रजोत्पादक वा शिपाई होऊ शकत नाहीत .  त्यांना कामकरी कीटक म्हणूनच जगावे लागते.

    ही अप्रत्यक्ष चेतक परिणाम करणारी फेरोमोने शरीरक्रियेवर नेहमीच निरोधक क्रिया करतात असे नाही .  काही वेळा त्यांचा परिणाम या उलटही असू शकतो .  शि स्टोसर्का ग्रि गेरिया हा प्रवासी टोळ प्रौढावस्थेत आपल्या शरीराच्या त्वचेवर एक प्रकारचा बाष्पनशील  ( बाष्परूपाने उडून जाणारा )  पदार्थ निर्माण करतो .  या पदार्थामुळे लहान टोळांची वाढ झपाट्याने होते .  हा स्राव व याचबरोबर स्पर्शग्राही व दृश्य संकेत यांच्या साह्याने प्रवासी टो ळां ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते .

  काही चेतक फेरोमोनांचा परिणाम प्राण्याच्या शरीरक्रियेवर होतो  पण त्यामुळे प्राण्याच्या वर्तनात विशेष फरक पडत नाही .  एस् ‌.  व्हॅन डर ली व एल् ‌.  एम् ‌. बूट या नेदर्लंड् ‌ स मधील व आणखी इतर काही अंतः स्राव वैज्ञानिकांनी १९५५ सालापासून सस्तन प्राण्यांच्या शरीरास येणाऱ्या वासावर बरेच संशोधन केले .  त्यांना असे आढळून आले की ,  उंदरांच्या माद्यांच्या अंगास येणाऱ्या वासाचा त्याच जातीच्या माद्यांवर अगदी अनपेक्षित परिणाम झाला . हा परिणाम या माद्यांच्या वर्तनावर झाला नाही .  चार माद्या एकत्र ठेवल्यावर त्यांच्यात आभासी गर्भधारणा दिसून आली .  याला  ‘ ली – बूट परिणाम ’  असे म्हणतात .  या गटात ठेवलेल्या माद्यांचे गंधकंद  ( गंधमार्गाचे मेंदूतील कंदासारखे अग्र ) काढले किंवा त्यांना एकत्र गटाने न ठेवता एकेकटे ठेवले ,  तर त्यांचे जनन तंत्र पुन्हा नेहमीसारखे होते .  असे आढळून आले की ,  जेव्हा या उंदरांच्या माद्यांना एकत्र गटात ठेवले तेव्हा त्यांच्या मदचक्रात अनियमितपणा दिसून आला .  काही वेळा हे मदचक्र पूर्णपणे बंद पडले .  डब्ल्यू .  के . व्हिटन या शास्‍त्रज्ञांस असे आढळले की ,  नर उंदराच्या वासामुळे मादी उंदराचे मदचक्र सुरू होते आणि नियमितपणे चालते .  या नराच्या वासामुळे मादीच्या मदचक्रात माद्यांना एकत्र ठेवल्यामुळे होणारे बिघाडही टाळले जातात .  हेलन ब्रूस या शास्‍त्रज्ञांस असे आढळले की , नंतर उंदराच्या वासामुळे नव्यानेच फलित झालेल्या मादीच्या गर्भधारणेस प्रतिरोध होतो .  उंदरातील फेरोमोने अजून रासायनिक दृष्ट्या समजलेली नाहीत  पण असे दिसते की ,  फलित झालेल्या मादीच्या शरीरातील प्रोलॅक्टिन या हॉर्मोनाची निर्मिती ,  त्याच जातीच्या दुसऱ्या नर उंदराच्या  ( जो फलनास जबाबदार नाही त्याच्या )  वासामुळे थंडावते .  याचा परिणाम असा होतो की ,  पीतपिंड ह्या अंडकोशात  ( ज्यामध्ये स्त्री – जनन पेशी उत्पन्न होतात त्या कोशात )  असलेल्या अंतः स्‍त्रा वी ग्रंथीची वाढ होत नाही आणि पुन्हा मदचक्र सुरू होते .

  


  मुक्तिकारक फेरोमोनांचा परिणाम केंद्रीय तंत्रिका तंत्रावर होतो व याची प्रतिक्रिया प्राण्यांच्या कार्यावर होते .  या फेरोमोनांच्या प्रकारात पुष्कळ प्राण्यांत आढळणारे लैंगिक प्रलोभक आहेत . यांपैकी सस्तन प्राण्यांत आढळणारे मस्कोन व सिव्हेटोन हे अनुक्रमे कस्तुरी मृग व कस्तुरी मांजर या प्राण्यांत सापडतात .  यांच्या वासामुळे या प्राण्यांना आपल्या अधिकाराचे मर्यादाक्षेत्र जाणणे ,  आपल्या क्षेत्राचे संरक्षण करणे व भिन्न लिंगांची एकमेकांस ओळख होणे यांसाठी मदत होते .

  

    कीटकांतील फेरोमोने  : कीटकांमधील फेरोमानांवर बरेच संशोधन झाले आहे .  यांपैकी पतंग ,  मुंग्या ,  मधमाश्या ,  झुरळे व भुंगे या कीटकांतील लैंगिक प्रलोभकांसंबंधी बरीच माहिती उपलब्ध झालेली आहे .  या कीटकांपैकी पतंग , मुंग्या व मधमाश्या यांसंबंधीची माहिती खाली दिली आहे .

  

   पतंग  : रेशमाच्या किड्याच्या पतंगातील फेरोमोनाला बाँबिकॉल एस्टर म्हणतात .  ए .  एफ् .  जे .  बूटेनांट या शास्‍त्रज्ञांना १२ मिग्रॅ .  बाँ बिकॉल मिळविण्याकरिता रेशमाच्या किड्याच्या पतंगाच्या २,५०,००० माद्या माराव्या लागल्या . जिप्सी मॉथ या पतंगाच्या ५,००,००० माद्यांपासून फक्त २० मिग्रॅ .  जीपल्यूर या नावाचे लैंगिक प्रलोभक फेरोमोन मार्टिन जेकॉबसन व त्यांच्या सहका ऱ्यां नी मिळविले .  हे मिळविण्यासाठी या शास्‍त्रज्ञांना निरनिराळी तंत्रे वापरावी लागली .  यापेक्षा एक वेगळे तंत्र वापरून आर् ‌.  टी . यामामोटो या शास्‍त्रज्ञांनी आपल्या सहका ऱ्यां च्या साहाय्याने १०,००० झुरळांच्या माद्यांपासून त्यांना न मारता नऊ महिन्यांच्या काळात १२·२ मिग्रॅ .  लैंगिक प्रलोभक फेरोमोन जमा केले .

  

   कीटकांतील प्रलोभकांची शक्ती अमर्याद असते.  बाँ बिकॉलाचे १०,००० रेणू जर रेशमाच्या किड्याच्या पतंगाच्या नराच्या शृंगिकांपासून  ( डोक्यावरील सांधेयुक्त स्‍पर्शेंद्रियांपासून) एक सेंटिमीटर अंतरावर सोडले, तर लाक्षणिक लैंगिक प्रतिक्रिया व्यक्त होते.  बाष्पनशीलता ,  विसरणशीलता  ( रेणू इतर रेणूंमध्ये मिसळण्याची क्षमता )  इ.  सर्व बाबींचा विचार करून असे अनुमान निघते की ,  या प्रतिक्रियेसाठी फार थोड्या रेणूंची  ( प्रती घ.  सेंमी.  मध्ये काही शेकडो रेणूंपेक्षाही कमी )  आवश्यकता आहे.  एका कीटकात असलेले ०·०१ मिग्रॅ .  इतके प्रलोभक द्रव्य  ( फेरोमोन ) १०० कोटी नर पतंगांना चेतना देण्यास पुरे पडते.  नैसर्गिक परिस्थितीत मादी आपल्या फेरोमोनाच्या साहाय्याने मोठ्या क्षेत्रात आपले अस्तित्व दर्शविते व नरास आकर्षित करते.  हे फेरोमोन हवेत इथके अल्प असते की, त्याची तुलना एका मोठ्या तळ्यात एक थेंब रंग टाकून सर्व पाणी रंगीत करण्यासारखे आहे.  हवेत इतक्या विरल प्रमाणात असलेले फेरोमोन नर पतंगास कसे मार्गदर्शक ठरते ,  यावरही संशोधन झाले आहे.  आय्.  श्विंक या शास्‍त्रज्ञांना असे आढळून आले की, नर पतंगास फेरोमोनाचा वास आल्याबरोबर तो ज्या दिशेने वारा वाहत असेल त्याच्या विरुद्ध दिशेने उडत जातो म्हणजे पर्यायाने मादी जेथे असेल तिकडे त्याचे उड्डाण होते.  जर त्याचे उड्डाण फेरोमोनाचा वास असलेल्या क्षेत्राबाहेर गेले, तर तो मादीचा शोध घेण्याचे सोडून देतो किंवा इकडे तिकडे उडून परत फेरोमोनाच्या क्षेत्रात शिरतो. जसजसा नर मादीच्या नजीक येऊ लागतो तसतसे हवेत फेरोमोनाचे प्रमाण वाढू लागते व नरास मादी जवळच असल्याची जाणीव होते.

  

   मुंगी  : समाजप्रिय कीटकांत रासायनिक संदेशवहनावर बरेच संशोधन झाले आहे .  या संदेशवहनास जबाबदार असलेली फेरोमोने प्राण्यांच्या अर्कात आढळली आहेत .  त्यातल्या त्यात मुंगीसंबंधीची या क्षेत्रातील बरीच माहिती उपलब्ध आहे . सर्व प्रकारच्या मुंग्यांत चांगली वाढ झालेल्या बहिः स्रावी ग्रंथी पुष्कळ असतात .  यांपैकी काहींत फेरोमोने तयार होतात .  फेरोमोनांच्या साहाय्याने मुंग्यांना जे मार्गदर्शन होते त्यास रासायनिक मार्गदर्शक म्हणतात . हे मार्गदर्शन मर्यादित स्वरूपाचे असून वारुळाच्या आत होणाऱ्या आणखी काही इतर संदेशविनिमयाची त्यास पूरक मदत होते ,  असा पूर्वी समज होता  पण आता असे आढळून आले आहे की ,  मार्गदर्शन करणारे फेरोमोन हे विलक्षण सर्वकामी आहे .  सोलेनॉप्सिस सीव्हिस्सेमा या मुंगीत एकच फेरोमोन तिला उत्तेजित करण्याचे आणि अन्न असणाऱ्या व वारूळ बांधण्यास योग्य अशा जागेकडे जाण्यास मार्गदर्शन करते . त्याचप्रमाणे कामकरी मुंग्यांस जेव्हा धोका असतो तेव्हा त्यांच्याकडून दिली जाणारी धोक्याची सूचनाही याच फेरोमोनाच्या साहाय्याने दिली जाते .  या मुंगीच्या शरीरात असणाऱ्या ड्यूफोर ग्रंथीतून  ( एल .  ड्यूफोर या कीटकशास्‍त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथीवरून ) या फेरोमोनाचे स्‍त्रवण होते  ( आकृती पहा ).  हा स्राव मुंगीच्या नांगीतून बाहेर पडतो व नांगीचा जमिनीस स्पर्श होऊन या स्रावाची तुटक रेषा जमिनीवर उठते .  वा फेरोमोनाचे रासायनिक स्वरूप स्पष्ट झालेले नाही .  या रेषेने कामकरी मुंग्या आकर्षित होतात . या आकर्षित झालेल्या मुंग्या रेषेच्या अनुरोधानेही या रेषेच्या उगमस्थानाकडे जातात .  जेव्हा रेषा तुटक असते तेव्हा मुंग्या वारुळाकडे जातात .  जर रेषा सलग असेल ,  तर त्या वारूळापासून दूर जातात .  हे मार्गदर्शक फेरोमोन बाष्पनशील असते आणि जमिनीवर पडल्यापासून 

   कामकरी मुंगीच्या शरीरातील बहिःस्रावाची ग्रंथी : (१) जंभ ग्रंथीतील (जबड्यामधील ग्रंथीतील) फेरोमोनाचा संचय, (२) ओष्ठीय ग्रंथी, (३) अनुपाश्विक ग्रंथी, (४) गुद ग्रंथी, (५) नांगी, (६) पाव्हान ग्रंथी (एम्. पाव्हान या कीटकशास्‍त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी ग्रंथी), (७) विष ग्रंथी. [मुंगीच्या जातीनुसार मार्गदर्शक फेरोमोने ड्यूफोर ग्रंथीतून, पाव्हान ग्रंथीतून वा विष ग्रंथीतून उत्पन्न होतात धोक्याची सूचना देणारी फेरोमोने गुद व जंभ ग्रंथीतून उत्पन्न होतात. इतर फेरोमोनांचे ग्रंथिक उद्‌गम अद्याप माहीत झाले नाहीत]. 

  दो न मिनिटांत ते हवेत उडून जाते.  यामुळे या मार्गदर्शनाने जाणारे कीटक सु.  ४० सेंमी.  पर्यंत प्रवास करू शकतात.  जरी यामुळे कीटकाच्या प्रवासावर बंधन येत असले,  तरी याचे इतर काही फायदेही आहेत. या शीघ्र बाष्पीभवनामुळे जुन्या मार्गदर्शक रेषा राहत नाहीत आणि त्यामुळे मुंग्यांचा होणारा गोंधळ टळतो.  तसेच सुरुवातीस फेरोमोनाची तीव्रता किती होती यावरूनही कामकरी मुंग्यांस अन्नाबद्दल काही अनुमान काढणे शक्य होते.  जर या मार्गाने जाऊन मुंग्यांना अन्न मिळाले,  तर वारुळाकडे परतताना त्या पुन्हा आपले फेरोमोन त्या मार्गावर टाकतात व यामुळे नवीन मुंग्यांना मार्गदर्शन होते.  अन्नाचा पुरवठा संपल्यावर मुंग्या त्या मार्गावर फेरोमोन टाकीत नाहीत व हळूहळू मुंग्यांची वर्दळ कमी होते.  या मुंग्यांनी मार्ग दर्शविण्याकरिता फेरोमोन टाकले की, ते त्या मार्गावर पसरते व त्या क्षेत्रास थोडी रुंदी प्राप्त होते.  या क्षेत्राच्या सीमेवर फेरोमोनाची तीव्रता जास्त असते,  त्यामुळे आजूबाजूस असलेल्या मुंग्यांना क्षेत्र ओळखण्यास सोपे जाते व त्यांचा मार्ग चुकत नाही. ज्या ठिकाणावर जाण्यासाठी फेरोमोनाचा उपयोग केला जातो त्या ठिकाणची दिशा व अंतर एकमेकांस कळविण्यासाठीही या मुंग्या एक विशिष्ट प्रकारची हालचाल करतात.  मधमाश्यांत जरी निराळ्या प्रकाराने संदेशवहन होत असले, तरी दिशा व अंतर एकमेकांस कळविण्याचे मार्ग सारखे आढळतात.  मधमाश्यांत  ‘ वॅगल डान्स ’ ( मागेपुढे व खालीवर अशा हालचालीचे नृत्य )  हा संदेशवहनाचा एक प्रकार आहे.  दोन विशिष्ट हालचाली अंतर दर्शवितात,  तर चार विशिष्ट हालचाली दिशा दर्शवितात. सगळ्याच मुंग्यांत मार्गदर्शक फेरोमोने असत नाहीत पण ज्या मुंग्यांत ते असते त्यांत ते त्या जातीपुरतेच वैशिष्ट्यपूर्ण असते.  इतर जातींतील मुंग्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही.  याचा अर्थ असा की,  प्रत्येक जातीच्या मुंग्यांत त्यांची रासायनिक स्वरूपाची भाषा असते. त्यामुळे एकाच क्षेत्रात दोन जातींच्या मुंग्यांनी फेरोमोन टाकून मार्गदर्शन केले,  तर त्यामुळे त्या दोन जातींत गोंधळ निर्माण होत नाही.


    मुंग्यांत धोका दर्शविणारी फेरोमोनेही असतात .  आतापर्यंत असा समज होता की ,  एक मुंगी आपल्या जातीच्या दुसऱ्या मुंगीस आपल्या शृंगिकांनी अगर डोक्याने स्पर्श करून धोक्याची सूचना देते  पण आता असे आढळले आहे की , धोक्याची सूचना देणाऱ्या फेरोमोनाचे स्वरूप रासायनिक आहे .  आतापर्यंत चार निरनिराळ्या जातींच्या कीटकांतून हे रासायनिक फेरोमोन काढून त्याचे स्वरूप सिद्ध केले गेले आहे .  मनुष्यास या रसायनांचा वास इतका तीव्रतेने येत नाही . काही वेळा तो सुखदायकही असतो  पण तीच रसायने या कीटकांत तत्कालिक व तीव्र स्वरूपाची प्रक्रिया निर्माण करतात .  पोगोनोमिरमेक्स बा डियस या जातीच्या कामकरी मुंग्यांत जंभ ग्रंथीतून  ( जबड्यातील ग्रंथीतून )  होणारा स्राव  ( आकृती पहा )  हा धोका दर्शविणारे फेरोमोन होय . हा स्राव ग्रंथीतून बाहेर पडल्यावर बाष्पीभवनामुळे तेरा सेकंदांत या फेरोमोनाचे ६ सें . मी .  त्रिज्येचे एक गोलाकार क्षेत्र तयार होते व हा गोल हळूहळू आकुंचन पावतो आणि सु .  ३५ सेकंदांत नाहीसा होतो .  या गोलाच्या बाहेरील रेषेवर फेरोमोनाचे प्रमाण कमी असले , तरी कामकरी मुंग्या आकर्षित होतात .  गोलाच्या मध्यावर जास्त प्रमाणात फेरोमोन असते व त्यामुळे मुंगीस धोक्याची सूचना मिळते . 

  मार्गदर्शक आणि धोक्याची सूचना देणाऱ्या फेरोमोनांखेरीज इतर संदेशवहन करणारी फेरोमोने असल्याचेही आढळून आले आहे .  या इतर फेरोमोनांमुळे वारुळाची काळजी घेणे ,  अन्नाची देवाणघेवाण ,  राणीमुंगीची देखभाल वा संरक्षण , लहान अर्भकांची काळजी वगै रें साठी संदेशवहन केले जाते .  मृत मुंगीची विल्हेवाट लावण्यासाठी संदेश देणारीही काही फेरोमोने आहेत .  या मृत मुंगीचे शरीर मृत्यूनंतर विघटित होते व त्यातून एक विशिष्ट प्रकारचे रसायन बाहेर पडते . या रसायनाचा वास आल्याबरोबर इतर कामकरी मुंग्या मृत शरीराची विल्हेवाट लावण्याकरिता येतात .  जर यदृच्छेने हे रसायन एखाद्या जिवंत मुंगीच्या शरीरास लागले ,  तर तिलाही तिच्या अंगास हा वास असेपर्यंत मृत मुंगीप्रमाणे वागविण्यात येते .  संशोधनांती असे आढळून आले आहे की , मुंगीच्या वारुळातील निरनिराळी कामे करण्यासाठी कमीत कमी १०  संदेशवहन करणाऱ्या फेरोमोनांची आवश्यकता आहे .

   मधमाश्या  : रासायनिक संदेशवहनाखेरीज आणखी प्रभावी संदेशवहनाची पद्धत मधमाशीत आढळते .  या कीटकांत मेणपोळ्याच्या पृष्ठभागावर नृत्याभिनय करून संदेशवहन केले जाते .  हे नृत्य  ‘ गोल गोल ’  अगर  ‘ वॅगल ’ या प्रकारचे असते व त्यामुळे इतर कामकरी मधमाश्यांना कोठे व कशाकरिता जायचे याचा बोध होतो .  काही वेळा राणी मधमाशी आपल्या जं भ ग्रंथीतून जे फेरोमोन बाहेर टाकते त्याचा परिणाम कामकरी माशीवर होतो . हे फेरोमोन कामकरी माशीच्या शरीरात गेल्यावर तिच्या अंडकोशाची वाढ खुंटते .  जे .  पेन यांच्या मते हे फेरोमोन म्हणजे पुष्कळशा निरनिराळ्या अम्लांचे मिश्रण होय .  एम् ‌.  बार्ब्ये आणि एन् ‌.  सी .  जॉन्स्टन यांच्या मते  α , β असंपृक्त ९ – ऑक्सिडेक  – २ – इनॉइक अम्‍ल या फेरोमोनामध्ये असते व याच्याच परिणामामुळे कामकरी मुंग्यांच्या अंडकोशाची वाढ खुंटते .  राणी माशीच्या मधुचंद्र उड्डाणाच्या वेळीही हेच फेरोमोन लैंगिक प्रलोभक म्हणून वापरले जाते . 

 


  काही परिस्थितीत कामकरी माशीच्या उदराच्या नासॉनॉफ ग्रंथीमधून  ( एच् ‌. बी .  नासॉनॉफ या शास्‍त्रज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथीमधून )  जिरॅनिऑल ह्या एका सुवासिक रासायनिक द्रव्याचे फेरोमोन म्हणून स्‍त्रवण होते. ह्या फेरोमोनाचे बाष्पीभवन झाल्यावर त्यामुळे इतर कामकरी माश्या आकर्षित होतात आणि वॅगल नृत्याला पोषक असे संदेश इतर कामकरी माश्यांना दिले जातात .  जेव्हा कामकरी माशी नांगी मारते , तेव्हा नांगीतील विषाबरोबरच नांगीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीमधून फेरोमोनाचे स्‍त्रवण होते व त्याच्या वासाने इतर कामकरी माश्यांनीही त्याच जागी नांगी मारावी असे संदेशवहन या फेरोमोनाद्वारे केले जाते.

  इतर प्राण्यांतील फेरोमोने :  इतर प्राण्यांतही संदेशवहनाच्या निरनिराळ्या प्रकारांबरोबरच फेरोमोन संदेशवहनाची पद्धती असावी असे दिसते .  उंदीर व प्रवासी टोळ यांच्यातील फेरोमोनाच्या साहाय्याने होणाऱ्या संदेशवहनाचा वर उल्लेख केलेला आहेच . 

  मानवात फेरोमोने असतात का या प्रश्नाचे निश्चित उत्तर देणे कठीण आहे .  सध्या फक्त इतकेच सांगता येईल की ,  काही रसायनांचा वास लैंगिक भेदावर आधारित आहे .  जे .  ल मॅगनेन या फ्रेंच जीववैज्ञानिकांना असे आढळले की ,  १४ – हायड्रॉक्सिटेट्राडेकेनॉइक अम्‍लाच्या संश्लेषित  ( कृत्रिम रीतीने तयार केलेल्या )  लॅक्टोनाचा वास फक्त वयात आलेल्या स्त्रीसच येतो आणि तोही अंडमोचनाच्या  ( अंडकोशातून अंड विसर्जित होण्याच्या )  वेळी जास्त तीव्रतेने येतो .  पुरुषांना व लैंगिक वाढ न झालेल्या मुलींना सापेक्षतः हा वास येत नाही पण पुरुषाला जर स्त्रीमदजन  ( इस्ट्रोजेन )  या हॉर्मोनाचे अंतः क्षेपण  ( इंजेक्शन )  दिले ,  तर वयात आलेल्या स्त्रीप्रमाणे त्यालाही हा वास येऊ लागतो ,  असे ल मॅगनेन यांना आढळून आले . यावरून जरी मानवातील फेरोमोनांच्या अस्तित्वाची निश्चिती करता आली नाही तरी मानवाच्या शरीरक्रियेत वासाला महत्त्व आहे हे सिद्ध होते . या विषयावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे व जसजशी अधिक माहिती उपलब्ध होईल तसतशी फेरोमोनांद्वारे होणाऱ्या रासायनिक संदेशवहनाची भाषा उकलत जाईल.

   रासायनिक स्वरूप  : रासायनिक दृष्ट्या प्रलोभक फेरोमोनाच्या संयुगामध्ये सामान्यतः  १० ते १७  कार्बन अणू असावेत व त्या संयुगाचा रेणुभार १८० ते ३००  च्या दरम्यान असावा .  या संरचनेमुळे प्रत्येक जातीचे वैशिष्ट्यपूर्ण फेरोमोन असणे शक्य होते .  जर ५  – ६ कार्बन अणू व १०० किंवा याहीपेक्षा कमी रेणुभार असता ,  तर निरनिराळी वैशिष्ट्यपूर्ण फेरोमोने शक्य झाली नसती .  असेही आढळून आले आहे की ,  जर कीटकांतील फेरोमोनाचा रेणुभार वाढविला ,  तर त्याची प्रलोभक शक्ती वाढते  पण या रेणुभार वाढीसही मर्यादा आहे . रेणुभाराबरोबरच फेरोमोनाच्या बाष्पनशीलतेवरही त्याची उपयुक्तता अवलंबून आहे .  वाढत्या रेणुभाराबरोबर फेरोमोनाची बाष्पनशीलता व विसरणशीलता कमी होत जाते . धोक्याची सूचना देणाऱ्या फेरोमोनाचा रेणुभार लैंगिक प्रलोभक फेरोमोनाच्या रेणुभारापेक्षा कमी असतो व त्याचे जातीय वैशिष्ट्यही कमी असते .  एका जातीच्या धोक्याची सूचना देणाऱ्या फेरोमोनामुळे दुसऱ्या जातीचे कीटकही संदेश ग्रहण करू शकतात  पण प्रलोभक फेरोमोनांचे तसे नाही . ती जास्त जातिनिष्ठ आहेत .  धोक्याची सूचना देणाऱ्या फेरोमोनांचे रेणू प्रलोभक फेरोमोनांच्या रेणूंहून लहान असतात .  धोक्याची सूचना देणाऱ्या सात ज्ञा त फेरोमोनांपैकी सहा फेरोमोनांत १० अगर त्यापेक्षा कमी कार्बन अणू असून एकात  ( डेंड्रोलासीन )  १५ कार्बन अणू आहेत . ऑर् ‌ गॅनोबोरेनाचा उपयोग करून जी .  ए .  मो लँ डर आणि के .  के .  वँ ग यांनी लूपर मॉथसारख्या पतंगांची लैंगिक फेरोमोने संश्लेषित  ( कृत्रिम रीत्या )  तयार केली आहेत .

   

  काही फेरोमोनांची रासायनिक संरचना सूत्रे  ( रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांची जोडणी दर्शविणारी सूत्रे )  पृष्ठ १००६ वर दिली आहेत .  यांतील १ ते ६ ही सूत्रे लैंगिक फेरोमोनांची असून ७ ते १० ही मुंग्यांतील धोक्याची सूचना देणाऱ्या फेरोमोनांची आहेत . ( यात कंसात त्या त्या प्राण्याच्या जातीचा निर्देश केला आहे ).

 पहा  :  प्राण्यांमधील संदेशवहन  मुंगी .

 संदर्भ  :  1. Karlson, P. Butenandt, A. Pheromones (Ectohormones) In Insects, Annual Review of Entomology, Vol. 4. 1959.

            2. Wilson, E. O. Pheromones, Scientific American, May 1963 . 

  इनामदार ,  ना .  भा .