प्रपिंडे :(ग्रंथी). वनस्पतींच्या शरीरात विशिष्ट पदार्थाचे उत्पादन करून तेथेच साठवून ठेवणारी कोशिका (पेशी) अथवा विशिष्ट पदार्थाची (उदा., साखरेचा द्रव) निर्मिती करून बाहेर टाकणारी कोशिका किंवा अनेक कोशिकांचा समूह (ऊतक) कधीकधी हा पदार्थ (उदा., रेझीन, चीक) कोशिकांनी वेढलेल्या पोकळीमध्ये साठून राहतो, तर कधी तो त्या उत्पादक कोशिकांना जोडणाऱ्या नळीतून शरीरात अन्यत्र किंवा शरीराबाहेर नेला जातो. प्राण्यांच्या ग्रंथीसंबंधीची माहिती ‘ग्रंथि’ या नोंदीत दिली आहे.

पहा : शारीर, वनस्पतींचे. 

 

परांडेकर, शं. आ.