पोर्तुगीज भाषा : यूरोप खंडाच्या नैर्ऋत्येला आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागातल्या पोर्तुगाल या छोट्या कर्तृत्ववान देशाची पोर्तुगीज ही भाषा आहे. ती इंडो-यूरोपियन भाषा-कुटुंबाच्या लॅटिन शाखेची, म्हणजे रोमान्स बोली आहे. शेजारच्या स्पॅनिश भाषेपेक्षा ती मुळात वेगळी नव्हती. पण राजकीय कारणांनी वेगळी पडल्यामुळे तिचा स्वतंत्रपणे विकास होऊन तिला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळाला. पोर्तुगीजचा सर्वांत जुना लिखित पुरावा ११९२ चा आहे.

दर्यावर्दी वसाहतवाल्या देशाची भाषा असल्यामुळे पोर्तुगीज भाषा जगात अनेक ठिकाणी पसरली. ब्राझीलची ती राष्ट्रभाषा असून शिवाय आफ्रिका, आशिया, ओशिआनिया, अमेरिका यांच्या काही भागांतही ती वापरली किंवा बोलली जाते. 

भारतातील गोवा, दीव, दमण इ. प्रदेशांत पूर्वी पोर्तुगीज राजवट होती आणि तेथे पोर्तुगीज ही सरकारी कामकाजाची भाषा होती. अजूनही काही लोक या भागात पोर्तुगीजचा वापर करतात. जवळजवळ चारशे वर्षांच्या संपर्कामुळे पोर्तुगीजचा गोव्यातील मूळ भाषेवर फार मोठा प्रभाव पडला असून मराठीतही अनेक पोर्तुगीज शब्द आले आहेत. उदा., जुगार, पगार, वाफर, चावी, काडतूस पाव (ब्रेड), खमीस इत्यादी.

पोर्तुगीज भाषिकांची संख्या दहा कोटींच्या घरात असून त्यांतले आठ कोटींवर एकट्या ब्राझीलमध्ये आहेत, तर खुद्द पोर्तुगालमध्ये ते एक कोटीच्या आसपास आहेत.

भाषिक वैशिष्ट्ये :लिपी व ध्वनी : पोर्तुगीज भाषा लेखनासाठी रोमन लिपीचा उपयोग करते. या लिपीत a, b, c , ξ, d, e, f, g, h, i, j, (k), l, m, n, o, p, q, r, s, t, u, v, (w), x, (y), z. ही अक्षरे आहेत. याशिवाय ~ हे अनुनासिकत्वाचे चिन्ह a व o या स्वरांवर लिहिण्यासाठी वापरले जाते.

या अक्षरांचे उच्चार पुढीलप्रमाणे : a आ b ब c + a, o, u किंवा व्यंजन क c + e, i स ch श ξ स d द e ए f (घर्षक) फ g + a, o, u किंवा व्यंजन ग g + e, i (तालव्य घर्षक) झ h नेहमी अनुच्चारित i इ j (तालव्य घर्षक) झ k क l ल lh ल्य m म, आणि शब्दान्ती स्वरानंतर आल्यास स्वर अनुनासिक पण स्वतःअनुच्चारित n न, आणि शब्दान्ती स्वरानंतर आल्यास स्वर अनुनासिक पण स्वतः अनुच्चारित nh न्य o ओ p प q क r र s दोन स्वरांमध्ये (दंत्य घर्षक) झ, व्यंजनपूर्व किंवा अंत्यस्थानी श, इतर ठिकाणी स t त u उ v (दंतौष्ठ्य) व w व x दोन स्वरांमध्ये (दंत्य घर्षक) झ, एरवी श y इ z (दंत्य घर्षक) झ.

व्याकरण : पोर्तुगीजमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, उद्‌गारवाचक व संबंधशब्द हे शब्दप्रकार आहेत.

नाम : नामात पुल्लिंग व स्त्रीलिंग ही लिंगे आणि एकवचन व अनेकवचन आहेत. पुरुषवाचक शब्द पुल्लिंगी व स्त्रीवाचक शब्द स्त्रीलिंगी असतात. उरलेल्या शब्दांत o शेवटी असलेले पुल्लिंगी व a शेवटी असलेले स्त्रीलिंगी असतात. e किंवा व्यंजन शेवटी असलेल्या शब्दांचे लिंग मात्र परंपरागत असते. ते प्रयोगावरून समजते.

नाम स्वरान्त असल्यास s (स्) व व्यंजनान्त असल्यास es (एस्) हे प्रत्यय अनेकवचनी लागतात. निर्गुण विशेषण एकवचनी पु. um व स्त्री. uma हे आहे. निश्चित विशेषण पु. o व स्त्री. a हे आहे. या सर्वांचे अनेकवचन s (स्) हे प्रत्यय लागून होते.


सर्वनाम : सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत :

  

कर्तृवाचक

ए.व.

अ.व.

प्र.पु.

eu

nós

द्वि.पु.

tu

vós

तृ.पु.

êle,ela

êles, elas

कर्मवाचक

प्रत्यक्ष

अप्रत्यक्ष

ए.व.

अ.व.

ए.व.

अ.व.

me

nos

me

nos

te

vos

te

vos

o

os

lhe

lhes

a

as

lhe

lhes

स्वामित्व विशेषण

एकवचन

अनेकवचन

पु.

स्त्री.

}

+ s

meu

minha

teu

tua

seu

sua

दर्शक सर्वनाम

एकवचन

अनेकवचन

स्वतःजवळचेपु. este

स्त्री. esta

}                                    + s

तुमच्याजवळचे पु. esse

स्त्री. essa

दूरचेपु. Aquêle,

स्त्री. aquela

         

 संबंधी सर्वनाम que जो, जी संबंधशब्दानंतर quem विशेषणवाचक पु. cujo, स्त्री. cuja अ. व. +s.

 प्रश्नार्थक quem कोण de quem कोणाचा que काय qual कोणता quais कोणते.


 विशेषण : विशेषणे सामान्यतः नामानंतर येतात व त्याच्या लिंगवचनाप्रमाणे. -o शेवटी असणाऱ्या पुल्लिंगी विशेषणाचे स्त्रीलिंगी रूप o बद्दल -a ठेवून होते. ão शेवटी असल्यास स्त्रीलिंगात ã येतो आणि -e शेवटी असल्यास स्त्रीलिंगात तेच रूप राहते. विशेषणापूर्वी mais ‘अधिक’ व नंतर que ‘पेक्षा’ ठेवून तुलनात्मक प्रयोग होतो, तर सर्वाधिकत्व अशा प्रयोगातील नाम किंवा mais यांच्यापूर्वी निश्चित विशेषणाचे योग्य ते रूप वापरून दाखवले जाते.

क्रियापद : तुबंत प्रत्ययानुसार पोर्तुगीज क्रियापदाचे तीन वर्ग पडतात : am-ar ‘प्रेम कर-णे’ ced-er ‘नम-णे’ part-ir ‘जायला निघ-णे.’ पुढील उदाहरणात ser ‘अस’, ester ‘अस’, ter ‘जवळ अस’, haver ‘जवळ अस’ या साहाय्यक क्रियापदांची वर्तमानकाळाची रूपे आणि नंतर am-ar ‘प्रेम कर’ या धातूची वर्तमान, अपूर्णभूत, भूत व भविष्य या काळांची रूपे दिली आहेत.

ser

estar

ter

haver

ए.व.

१.

sou

estou

tenho

hei

२.

és

estás

tens

has

३.

é

esta

tem

ha

अ. व.

१.

somos

estamos

temos

havemos(hemos)

 

२.

sois

estais

tendes

haveis(heis)

३.

são

estão

tém

hão

am-ar

वर्तमान

अपूर्णभूत

भूत

भविष्य

ए. व.

१.

amo

amava

amei

amarei

२.

amas

amavas

amaste

amarás

३.

ama

amava

amou

amará

अ. व.

१.

amamos

amavamos

amamoas 

amaremos

२.

amais

amaveis

amastes

amareis

३.

amam

amavam

amaram

amarão

             

आत्मवेधी क्रियापदे कर्मस्थानी me, te, se, nos, vos, se या रूपांचा उपयोग करतात. सर्व क्रियापदांचे मिश्र काळ ter या क्रियापदाची रूपे धातुसाधिताबरोबर वापरून होतात. भूतकाळवाचक धातुसाधित –ar शेवटी असणाऱ्या धातूंना –ado व इतर धातूंना –ido हे प्रत्यय लावून होतात : tenho amado ‘मी प्रेम केलं आहे’.

क्रियाविशेषण : काही क्रियाविशेषणे सिद्धआहेत, तर इतर विशेषणाच्या स्त्रीलिंगी रूपाला –mente हा प्रत्यय लावून साधली जातात.

उभयान्वयी अव्यय : e ‘आणि ’ mas ‘पण’ ou ‘किंवा’ porque ‘कारण’ se ‘जर’ quando ‘जेव्हा’ paraque ‘म्हणून, यासाठी’ इत्यादी.

उद्‌गारवाचक : ai ‘अरेरे! ’ perdão ‘माफ करा!’ obrigado ‘आभार!’.

संदर्भ : 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les langues du monde, Paris, 1952.

            2. Meillet, Antoine, Les langues dans I’Europe nouvelle, Paris, 1928.

           3. Pei, Mario, The World’s Chief Languages, London, 1954.

कालेलकर, ना. गो.