ॲरोमॅटीकरण : ॲलिफॅटिक व ॲलिसायक्लिक हायड्रोकार्बनांचे [→ॲलिफॅटिक संयुगे ॲलिसायक्लिक सयुगे] ॲरोमटिक हायड्रोकार्बनांत [→ ॲरोमॅटिक संयुगे]रूपांतर करणे या प्रक्रियेस ‘ॲरोमॅटीकरण’ म्हणतात. खनिज तेल उद्योगधंद्यात या प्रक्रियेला फार महत्त्व आहे.

दुसऱ्या महायुद्धकाळी स्फोटक द्रव्यांच्या निर्मितीकरिता टोल्यूइन या संयुगाची फार आवश्यकता होती. त्या वेळी खनिज तेलापासून मिळणाऱ्या ‘नॅप्थिने’ या पदार्थापासून ॲरोमॅटीकरणाने प्रचंड प्रमाणावर टोल्यूइन बनविण्यात आले. यात नॅप्थिनांमध्ये असणाऱ्या मिथिल सायक्लोहेक्झेन या घटकाचा हायड्रोजननिरास करून (हायड्रोजन काढून टाकून) टोल्यूइन मिळविण्यात आले.

2

+

3H2

मिथिल सायक्लोहेक्झेन 

 

टोल्यूइन 

   

या विक्रियेकरिता विक्रियाशील (जास्त क्रिया करण्याची प्रवृत्ती असलेल्या) ॲल्युमिनावर निक्षेपित (साठविलेल्या) मॉलिब्डेनम ऑक्साइडाचा किंवा निकेल व टंगस्टन सल्फाइडे यांचा उत्प्रेरक (विक्रियेत भाग न घेता विक्रिया जलद घडवून आणणारा पदार्थ) म्हणून उपयोग करण्यात आला.

अलीकडे ‘प्लॅटफॉर्मिंग’ या नावाने ओळखली जाणारी एक जास्त कार्यक्षम पद्धत प्रचारात आली आहे. तिच्यात ॲल्युमिनावर निक्षेपित केलेले प्लॅटिनम हे उत्प्रेरक म्हणून वापरतात. या पद्धतीने होणाऱ्या ॲरोमॅटीकरणात विविध क्रियांचा समावेश होतो. तीत वरीलप्रमाणेच हायड्रोजननिरास होऊन मिथिल सायक्लोहेक्झेनापासून टोल्यूइन तर होतेच, पण त्याशिवाय नॅप्थिनातील मिथिल सायक्रोपेंटेनाचे समघटकीकरण (रेणूमधील अणूंची संख्या व त्यांचे प्रकार तेच असलेले पण त्यांची रचना भिन्न असलेल्या संयुगात रूपांतर) होऊन सायक्लोहेक्झेन बनते व त्याचा हायड्रोजननिरास होऊन बेंझीन बनते.

+

3H2

मिथिल सायक्लोपेंटेन 

 

सायक्लोहेक्झेन 

 

बेंझीन 

   

याशिवाय विक्रियामिश्रणात असलेल्या n-हेप्टेनाचे वलयीकरण (शृंखलायुक्त संयुगाचे रेणूमध्ये एक वा अधिक बंद वलये असलेल्या संयुगात रूपांतर) होऊन प्रथम मिथिल सायक्लोहेक्झेन बनते व त्याचा हायड्रोजननिरास होऊन टोल्यूइन बनते.

H3C-CH2-CH2-CH2-CH2-CH2-CH3

→ 

→ 

n-हेप्टेन

 

मिथिल सायक्लोहेक्झेन 

 

टोल्यूलन 

खनिज तेल उद्योगधंद्यात तेलाच्या खंडांचे उच्च तापमानास भंजन (तापवून घटक द्रव्ये सुटी करणे) केले जाते तेव्हा प्रोपेन व त्यासारखी लहान कार्बनशृंखला असलेली हायड्रोकार्बने निर्माण होतात. त्यांपासून वलयीकरण व हायड्रोजननिरास होऊन ॲरोमॅटिक संयुगे बनतात.

3(H3C-CH2-CH3)

+

3CH4

प्रोपेन 

 

सायक्लोहेक्झेन 

   
   

   
   

+

3H2

   

बेझीन 

   

उच्च ऑक्टेन अंक (इंधनाची आघात निर्माण करण्याची क्षमता दर्शविणारा अंक, → अंतर्ज्वलन एंजिन) असलेली, मोटारी व विमाने यांची इंधने आणि रासायनिक उद्योगधंद्यात उपयोगी पडणारी बेंझीन, टोल्यूइन, झायलीन इ. रसायने खनिज तेलापासून बनविण्याकरिता ॲरोमॅटीकरण प्रक्रिया उपयोगी पडतात.

संदर्भ :  1. Furnas, C. C. Ed. Roger’s Manual of IndustrialChemistry, New York, 1942.

    2. Murphy, W. J. Modern Chemical Processes, Vol. 2, Washington, 1961.

    3. Shreve, R. N. Chemical Process Industries, Tokyo, 1956.

दीक्षित, व. चिं.