आकार्यता: घनरूप पदार्थाला त्याच्या शरणबिंदूपेक्षाही (विकृती सुरू करणाऱ्या प्रतिबलमूल्यापेक्षाही) मोठे प्रतिबल (एकक क्षेत्रफळावरील प्रेरणा) लावले असता त्याचा आकार अथवा विस्तार यांमध्ये कायमचा बदल ज्या गुणधर्मांमुळे होतो ,त्याला ‘आकार्यता’ असे म्हणतात. सरपट (प्रतिबल स्थिर असताही हळूहळू प्रतिविकृती म्हणजे लांबी, क्षेत्रफळ किंवा घनफळ यांतील, त्या त्या एककातील बदल वाढत जाणे) व प्रतिबल-क्षय हे आकार्यतेशी संलग्न गुणधर्म आहेत. या गुणधर्माचा अभ्यास स्त्रोतशास्त्रामध्ये करण्यात येतो. 

पहा : स्थितिस्थापकता स्रोतशास्त्र.

पुरोहित, वा. ल.