अबनूस:(माळिया, ताई, तेंडू हिं. एबन्सक. कारमराइं. सीलोन एबनी लॅ. डायोस्पिरॉस एबेनम कुल – एबेनेसी ). मध्यम आकाराचा हा सदापर्णी वृक्ष दख्खन व कर्नाटकमधील शुष्क पण सदापर्णी जंगलात आढळतो. शिवाय कोईमतूर, कूर्ग, मलबार व कोचीन ते त्रावणकोर, श्रीलंका व मलेशिया येथेही आढळतो. खोड ताठ, सरळ असून फांद्यांच्या टोकांस पाने येतात. साल पातळ, गर्द भुरी, खरबरीत, किंवा काहीशी गुळगुळीत असून त्यावर बारीक भोके (वल्करंध्रे) असतात. पाने मध्यम आकाराची, साधी, जाडसर, अंडाकृती, वरून हिरवी, चकचकीत, खालून फिकट फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨एबेनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणेती एकलिंगी व एकाच झाडावर असतात. पुं-पुष्पे ३–१२, फिकट हिरवट पिवळी, आखूड देठाच्या वल्लरीवर फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात स्त्री-पुष्पे एकाकी, मोठी [ → फूल] मृदुफळ २ सेंमी. व्यासाचे, गोलसर, कठीण संवर्ताच्या पेल्याने वेढलेलेबिया ३–८ व काळ्या. अबनुसाच्या लाकडाचा बाहेरचा भाग करडा व त्यात पट्टे असून मध्यकाष्ठ काळे असते. ते जड व कठीण असते त्यावर केलेली झिलई चांगली टिकते ते वाळवी व रोगकारक वनस्पतींपासून (कवकांपासून) सुरक्षित असते. उत्तम सजावटी सामान, कपाटे, कोरीव व जडावाचे काम, वाद्ये, आच्छादन, लाकडी फरसबंदी इत्यादींस फार उपयुक्त असते. त्याची फारशी तोड व निर्यात करीत नाहीत. झाडाचे भाग स्तंभक (आकुंचन करणारे), तनूकारी (रक्त पातळ करणारे), शरीरातील खड्यांचे (अश्मरींचे) चूर्ण करणारे असून मत्स्यविष असतात.
पहा :वनस्पति, विषारी.
जमदाडे, ज. वि.