अष्टविनायक : महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध आठ गणपतिक्षेत्रांतील गणपतींना ‘अष्टविनायक’ म्हणतात. त्यांची नावे, स्थाने व जिल्हे अनुक्रमे पुढीलप्रमाणे होत: (१) मोरेश्वर (अथवा मयूरेश्वर) मोरगाव पुणे. (२) सिद्धिविनायक सिद्धटेक नगर. (३) बल्लाळेश्वर पाली कुलाबा. (४) वरदविनायक (अथवा विनायक) महड (अथवा मढ) कुलाबा. (५) चिंतामणी थेऊर पुणे. (६) गिरिजात्मज लेण्याद्री पुणे. (७) विघ्नेश्वर ओझर पुणे. (८) श्री. गणपती रांजणगाव पुणे.
गणेशपुराण व मुद्गलपुराण यांतील गणपतीसंबंधीच्या निरनिराळ्या कथा लौकिक रूढीने वरील क्षेत्रांशी निगडित झालेल्या आहेत. मुद्गल- पुराणात मयूरेश्वराला सर्वांत श्रेष्ठ म्हटले असून, इतर आठ‘महागणपती’ ही दिले आहेत. त्यांतील काही महाराष्ट्रातील तर काही महाराष्ट्राबाहेरचे आहेत.
पहा : गणपति.
संदर्भ : खेर, द. म. श्री अष्टविनायक, पुणे, १९६२.
केळकर, गोविंदशास्त्री
“