अनुवासन : (आयुर्वेद). एक चिकित्साप्रकार वा बस्तीचा प्रकार. औषधीसिद्ध तेल इ. स्नेह ज्यात आधिक्याने असतो असा बस्ती. जो पोटात दिल्यानंतर राहीला तरी दोषकारक होत नाही किंवा जो  बस्ती एकदा दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशीही देता येतो तो. हा  ४ तोळे प्रमाणाने दिला तर त्याला ‘मात्रा-बस्ती’ म्हणतात. स्नेहाचा उत्तर बस्ती- सुद्धा अनुवासनच होय. अनुवासन-बस्ती कोणाला द्यावयाचा, कोणाला नाही, हे शास्त्रकारांनी सांगितले आहे. रूक्ष, अतिदीप्ताग्नी, केवळ वातरोगी इत्यादींना हा द्यावा. पांडुरोगी, कावीळ झालेला इत्यादींना देऊ नये.

जोशी, वेणीमाधवशास्त्री