अनुपगढ : राजस्थान राज्याच्या गंगानगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व भारताच्या वायव्य सीमेवरील वाळवंटातील गढी म्हणून संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचे ठाणे. लोकसंख्या ४,५७०(१९७१). उत्तर रेल्वेच्या सुरतगढ प्रस्थानकापासून पश्चिमेस अनुपगढपर्यंत ७९ किमी. फाटा गेलेला आहे. गंगानगर, बिकानेर व रायसिंघनगर ह्या शहरांशी अनुपगढ सडकांनी जोडलेले आहे. येथूनच पाकिस्तानमधील बहावलपूरकडे जाण्याचा मार्ग होता. अनुपगढ सोत्रा नदीकाठी वसले असून येथे धान्याचा व्यापार, हातमागाचा उद्योग आणि उंटांचे जोपसनाकेंद्र आहे.
ओक, शा.नि.