अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी हा अनंतपूजेचा दिवस, एक व्रत व उत्सव म्हणून साजरा करतात. वनवासामध्ये पांडवांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली, तेव्हा कृष्णाने त्यांना हे अनंतव्रत, इच्छित-फलदायक म्हणून करण्यास सांगितले. अनंतपूजनात उदक-कलशाभोवती दोरा गुंडाळला जातो. तो दोरा पुढे पवित्र म्हणून सांभाळावयाचा असतो. ह्या व्रताचा प्रसार वैण्षवांत विशेष आहे. चौदा वर्षे हे व्रत आचरल्यावर त्याचे उद्यापन करतात. गणेशचतुर्दशीला गणपतीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्थीला त्याचे सार्वजनिक रीत्या उत्सवपूर्वक विसर्जन करण्याची प्रथा महाराष्ट्रात पाळली जाते.

करंदीकर, ना. स.