अलगियवन्न मोहोट्टाल : (१७ वे शतक). एक प्रसिद्ध सिंहली कवी. ‘मुकवेही’ ह्या नावानेही तो ओळखला जातो. कुसजात हा त्याचा महत्त्वाचा काव्यग्रंथ असून त्यात त्याने याच नावाच्या जातकग्रंथाचे पद्यात्मक रूपांतर केले आहे. सुभाषित काव्य नावाच्या त्याच्या ग्रंथात दृष्टांतकथा आणि पद्यात्मक वचने यांचा संग्रह आहे. सावुल संदेशम् अथवा कुक्कुटदूत नावाचे काव्य तसेच दहम्सोंडजातक, मुनिगुण, रत्‍नमालयदुस्सीलवेत, परांगिहटन, महाहटन हे दुर्मिळ ग्रंथही यानेच रचिले असावेत, असे मानले जाते.

 

पांडे, वि. गो.