अभ्यासगान : केवळ रियाजासाठी वा अभ्यासासाठी असलेले संगीत. आवाजाच्या यथायोग्य विकसनासाठी आणि वादनात उपयोगी पडणाऱ्या सर्व स्वरांच्या व पलट्यांच्या (उदा., सारे, सारे, ग, सागरेम असे सरल व वक्र स्वरालंकार) कौशल्यप्राप्तीसाठी त्याची जरूरी आहे. मैफलीतील सभागानाच्या पूर्वतयारीसाठी अभ्यासगान उपयुक्त ठरते. त्याच्या अभ्यासामुळेच सभागान बिनचूक व नटवून सजवून गातावाजविता येते. 

सांबमूर्ती, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)